Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: हॉटेलमधील रूममध्ये घुसून महागडा मोबाईल चोरणाऱ्यास अटक; हणजुणे पोलिसांची कारवाई

आरोपी हणजुणेतील डीमेलोवाडोचा रहिवासी

Akshay Nirmale

Goa Crime: वागातोर येथील एका हॉटेलमधील एका रूममध्ये घुसून महागड्या मोबाईल फोनची चोरी करणाऱ्यास हणजुणे पोलिसांनी अटक केली आहे. म्हापसाचे एसडीपीओ जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार नितीन सूर्यनारायण साहू (वय 24) यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती.

साहू हे योयो गोवा वागातोर येथे राहत होते. 2 आणि 3 ऑक्टोबर रोजीच्या दरम्यान, योयो गोवा वागातोर रिट्रीट हॉटेल येथील रूमनंबर 103 मध्ये अनोळखी व्यक्तीने घुसून चोरी केली होती. अज्ञात चोरट्याने सॅमसंग एस 4 हा फोल्ड मोबाईल चोरला होता.

तसेच एअरटेल आणि जिओ सिम कार्डदेखील चोरली होती. हे सर्व साहित्य रोहन बाबुला साहू यांचे होते. ते नितीन साहू यांचे बंधू आहेत. एकूण दीड लाखाचा मुद्देमाल अज्ञाताने लंपास केला होता.

या तक्रारीनंतर हणजुणे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशाल देसाई यांनी तत्काळ एक पथक नेमून या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.

या पथकात पोलिस उपनिरीक्षक आशिष परब, हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर गवंडी, कॉन्स्टेबल महेंद्र मांद्रेकर, रूपेश आजगावकर, अभिषेक कासार, आदर्श, मयुर घाडी, किशन बुगडे यांचा समावेश होता.

पोलिसांना त्यांच्या विश्वसनीय सूत्रांकडून ही चोरी कुणी केली याबाबत माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे आणि चोरट्याचा माग काढत पोलिसांनी पुंडलिक चव्हाण (वय 27) याला अटक केली. तो हणजुणेतील डीमेलोवाडो येथील रहिवासी आहे. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT