Crime in Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime : शापोरात आढळला विदेशी व्यक्तीचा मृतदेह

हुडोवाडा-शापोरा येथील एका स्थानिकाच्या घरात पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या स्टेफानो मायटीनो (65) या इटालियन पर्यटकाचा मृतदेह रविवारी सकाळी संशयास्पद स्थितीत पोलिसांना आढळून आला.

दैनिक गोमन्तक

शिवोली : हुडोवाडा-शापोरा येथील एका स्थानिकाच्या घरात पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या स्टेफानो मायटीनो (65) या इटालियन पर्यटकाचा मृतदेह रविवारी सकाळी संशयास्पद स्थितीत पोलिसांना आढळून आला.

सविस्तर वृत्तानुसार, मृत स्टेफानो मायटीनो गेले कित्येक दिवस शापोरात वास्तव्य करून राहात होता. रविवारी सकाळी त्याच्या खोलीचा दरवाजा उघडत नसल्याने तसेच आतमधून कुणीच आवाज देत नसल्याने घाबरलेल्या घरमालकाने स्थानिक पोलिसांना याबाबतीत माहिती दिली व रितसर तक्रार दाखल केली.

घटनेची माहिती मिळताच हणजुणे पोलीस स्थानकाच्या उप-निरीक्षक स्वाती सावळ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत म्हापसा अग्निशमन दलाच्या मदतीने खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला व बेडरुममध्ये मृतातावस्थेत पडलेल्या स्टेफानोचा मृततदेह ताब्यात घेतला.

हणजुण पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी बांबोळीच्या गोमेकॉत पाठवून दिला आहे. दरम्यान, स्टेफानोच्या मृत्यूची माहिती इटालीयन दुतावासाला देण्यात आल्याची माहिती उप-निरीक्षक स्वाती मळीक यांनी दिली. पुढील तपास जारी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT