Goa Crime News | Fatorda Murder Attempt Dainik Gomantak
गोवा

Fatorda Attack Video : भयानक! फातोर्डात दुकानातील साथीदारावरच कोयत्याने जीवघेणा हल्ला; पहा व्हिडिओ

पोलिसांना अद्याप आरोपीचा शोध लावता आलेला नाही. दरम्यान काल या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

दैनिक गोमन्तक

Fatorda Murder Attempt : 8 जानेवारी रोजी जुगलराम चौधरी हार्डवेअर दुकान मालकावर त्याच्याच साथीदाराने हल्ला केला आणि त्याला गंभीर जखमी करून आरोपी पळून गेला. पोलिसांना अद्याप आरोपीचा शोध लावता आलेला नाही. दरम्यान काल या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आरोपीने रागातून हे कृत्य केले असल्याचे सांगण्यात येत आहे.

Fatorda Murder Attempt

मारवाडी समाजाचे सदस्य गजेंद्रसिंग राजपुरोहित यांनी सांगितले की, आम्ही फातोर्डा पीआयसमोर दोन मागण्या ठेवल्या आहेत एक म्हणजे गुन्हेगाराला तात्काळ अटक करावी आणि त्याला आयपीसी कलम 307 अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करावा.

फातोर्डा पीआय नाईक म्हणाले, आम्ही पहिल्या दिवसापासून आरोपीचा माग काढत आहोत, आम्ही आरोपीच्या फ्लॅटवर पाळत ठेवत आहोत. शिवाय एक टीम देखील राजस्थानला पाठवली आहे. आज आम्ही दुसरी टीम वेगवेगळ्या ठिकाणी पाठवली आहे.

इथे पहा हा व्हिडिओ :

गुन्ह्याच्या घटनेनंतर आरोपीचा फोन बंद होता. पीडित साथीदाराच्या भावाने तक्रार दिली होती कारण तो रुग्णालयात दाखल होता. आम्ही लवकरच आरोपीचा शोध घेऊ आणि त्याच्यावर IPC च्या 307 अंतर्गत गुन्हा दाखल करू.

याबाबत मारवाडी समाजाचे गजेंद्रसिंग राजपुरी म्हणाले आरोपीला लवकरात लवकर ताब्यात घेण्याची विनंती केली. पुढे ते म्हणाले की आम्ही पोलिसांना आरोपीवर कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची विनंती केली असून पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे आम्हाला आशा आहे की लवकरच आरोपी पकडला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोरेपणाच्या मोहात आरोग्य धोक्यात? नागपुरातील 18 महिलांना किडनीचा त्रास; 'Made in Pakistan' फेअरनेस क्रीमवर गंभीर आरोप

Goan Food Culture: अळवा, वाल अन् पालक भाजीला 'वडी'ची फोडणी! कोंकणी खाद्यसंस्कृतीचा चेहरा बदलणारा एक पारंपारिक पदार्थ

Goa Education: अनुदानित शाळांतील विद्यार्थी संख्‍येत घट; विनाअनुदानित शाळांतील संख्‍येत मात्र सातत्‍याने होतेय वाढ

'Telegram'ला 15 दिवसांचा अल्टिमेटम! चित्रपट आणि OTT कंटेंटप्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका, पायरसीविरोधात मोठं पाऊल

Goa Solar Scheme: राज्याची सौर अनुदान योजना रखडली; शेकडो अर्जदार प्रतीक्षेत, 3 वर्षे मुदतवाढीची अधिसूचना अद्याप नाही

SCROLL FOR NEXT