Siolim Firing Case | Siolim Shootout Case Dainik Gomantak
गोवा

Siolim Firing Case: शिवोली हॉटेल गोळीबार प्रकरणातील चौथा आरोपीही हणजूणे पोलिसांच्या ताब्यात

लक्ष्मण हरिजन असे आरोपीचे नाव असून त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

दैनिक गोमन्तक

Siolim Shootout Case: काही दिवसांपूर्वी शिवोलीमधील हॉटेलमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यावेळी आरोपी गोळीबार करून हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयाने जेम्स डिसुझा, मोहम्मद मनियार, सूरज सिंग या तिघाही संशयितांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. आता यातील चौथ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.

शिवोली गोळीबार प्रकरणातील चौथ्या फरार आरोपीला हणजूणे पोलिसांनी अटक केली आहे. म्हापशाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण हरिजन असे आरोपीचे नाव असून त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

त्याबरोबर आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मारुती झेन कार क्रमांक GA-01-S-2608 ही गाडीही जप्त करण्यात आली आहे. याआधीच या घटनेतील तिघेजण पोलिसांच्या ताब्यात आहेत.

संपूर्ण प्रकरण असे की....

वाडी-शिवोली येथील एल पॅत्रोन या रेस्टॉरन्टमध्ये बुधवारी 1 वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपींचा चार-पाच जणांचा गट आला. संशयित रेस्टॉरन्टच्या बार काऊंटरसमोर उभे राहिल्याने रेस्टॉरन्ट चालक अक्षद शेट्ये यांनी त्यांना बाजूला राहण्याची सूचना केली.

त्यावरुन संशयितांनी त्यांच्याशी वाद घातला व शिवीगाळ केली. यावेळी त्याच्यातील संशयित जेम्स सोझा याने त्याच्याकडील पिस्तूल काढले व रेस्टॉरन्ट चालकावर पिस्तूलाची गोळी झाडली.

यात सुदैवाने रेस्टॉरन्ट चालक बचावले. तसेच संशयिताने रेस्टॉरन्ट चालक व कामगारांना यावेळी धमकी दिली व तेथून निघून गेला. दरम्यान, रेस्टॉरंट मालकाने या घटनेबाबत बुधवारी हणजूण पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारीच्या आधारे म्हापसा पोलिसांनी जेम्स डिसोझा (44) रा. धुळेर बार्देश, मोहम्मद मणियार (29) रा. करासवाडा, बार्देश यांना अटक केली होती. तर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला तिसरा संशयित सूरज सिंग (19) रा. करासवाडा याला थिवी रेल्वे स्थानकावरुन अटक करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT