goa roadside dead body case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: जखमांच्या खुणा! ओल्ड गोव्यात रस्त्याच्या कडेला आढळला मृतदेह; 'त्या' तरुणाच्या मृत्यूचं गूढ काय?

Old Goa dead body found: सकाळी रस्त्याच्या कडेला एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली

Akshata Chhatre

पणजी: गोव्यातील ओल्ड गोवा परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रविवारी (दि.२४) सकाळी रस्त्याच्या कडेला एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतदेहाजवळ काही बॅगा आणि वैयक्तिक वस्तू पडलेल्या होत्या. तसेच, मृतदेहावर जखमांच्या खुणाही दिसत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे हा अपघात आहे की घातपात, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल. सध्या पोलीस वेगवेगळ्या दिशेने तपास करत आहेत आणि अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

13 वर्षीय भाच्याला 10 वेळा चाकूनं भोसकलं

नात्यातील विश्वासाला काळिमा फासणारी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातून समोर आली होती. येथील एका 13 वर्षीय मुलावर त्याच्याच कथित मामाने चाकूने जीवघेणा हल्ला केला. आरोपीने मुलावर तब्बल 10 वेळा चाकूने वार केले आणि तो मेला असे समजून त्याला झुडुपांमध्ये फेकून पळ काढला. मात्र, प्रसंगावधान राखत या चिमुकल्याने दाखवलेली हिंमत त्याच्या आयुष्याची ढाल ठरली. संपूर्ण घटना बिलासपूर जिल्ह्यातील मस्तुरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बटाही पुलाजवळ घडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

Goa Agriculture: कोकमला अवकाळी पावसाचा फटका, लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ; हवामान बदलाने उत्पादनात चढ-उतार

Goa Weather: गोव्यात उन्हाचा तडाखा अन् सत्तरी-साखळीत वादळी पाऊस; पुढील 4-5 दिवस उष्मा कायम राहणार

Tourist Safety: दलालांवर 'ड्रोन'ची नजर, एआयने आवळणार फास; 'बीच व्हिजिल ॲप'ही होणार अपग्रेडच, पर्यटनमंत्र्यांची माहिती

VIDEO: कदंब कर्मचाऱ्यांवर कोयता घेऊन धावला; हल्ल्याच्या प्रयत्नानंतर रिवे मार्गावरील बससेवा दोन दिवसांपासून बंद

SCROLL FOR NEXT