Goa Crime Dainik Gomantk
गोवा

Goa Crime: नवजात अर्भकांना बेवारस सोडण्याच्या घटनांमध्ये मुलींची संख्या जास्त; धक्कादायक आकडेवारी समोर

Ganeshprasad Gogate

Goa Crime: एकीकडे गोवा सरकार मुलीला जन्म देणाऱ्या मातेसाठी ममता योजनेसारखी आर्थिक पाठबळ देणारी योजना राबवत असून दुसरीकडे मात्र मुलींच्या जन्मापासूनच त्या नवजात अर्भकाची अवहेलना करण्यात येत असल्याचे प्रकार सुरु झाले आहेत.

गेल्या पाच वर्षांमध्ये गोव्यात नवजात अर्भकांना सोडून दिल्याच्या 11 धक्कादायक घटना घडल्या आणि दुर्दैवाने त्यातील तब्बल सात घटनांमध्ये लहान मुलींचा समावेश असल्याची माहिती समोर आलीय.

काही दिवसांपूर्वी मिरामार सर्कलजवळ 10 दिवसांची चिमुरडी बेवारस अवस्थेत आढळून आल्यावर पुन्हा या दुर्दैवी प्रकारांनी डोकं वर काढलाय. मिरामार सर्कल जवळ अर्भकाच्या रडण्याचा आवाज ऐकून तिथून जाणाऱ्या लोकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पणजी पोलिस घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांना तिथल्या कचर्‍याच्याकुंडीत एका पेटीत नवजात अर्भक आढळून आले. बाळाला तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी बांबोळी येथे गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

पोलिसांनी बेवारस अवस्थेत मुलीला सोडणाऱ्या आईची ओळख पटवली आहे आणि तिला अटक देखील केली आहे. ती गोव्याची महिला असून सध्या तिची चौकशी सुरू आहे.

यावर घटनेवर प्रतिक्रिया देताना बालकल्याण समितीच्या अध्यक्षा एस्थर नोरोन्हा म्हणाल्या, ''दत्तक एजन्सीबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली पाहिजे. काही प्रकरणांमध्ये आईच मुलाला ठेवू इच्छित नाही अशावेळी आपण सर्वकाही बाजूला ठेवून तिला मदत केली पाहिजे आणि मुलाला कुटुंब मिळण्यास मदत केली पाहिजे.

दरम्यान, एआरझेडचे संस्थापक आणि संचालक अरुण पांडे म्हणाले, “सामान्यतः, आई तिच्या मुलाला कधी स्वतः पासून दूर करत नाही आणि जेव्हा ती असं करते तेव्हा परिस्थितीच अशी बिकट असते कि तिला दुसरा कोणताही पर्याय नसतो.

सध्याच्या प्रकरणात कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींनी केवळ मुलाला कोणी सोडून दिले एवढाच तपास मर्यादित ठेवू नये तसेच आईला गुन्हेगार म्हणून नव्हे तर पीडित म्हणून वागवण्याची गरज आहे.”

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT