goa kidnapping case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: दिवसाढवळ्या अल्पवयीन मुलीचे अपहरण, राजस्थानच्या आरोपीने केले अज्ञातस्थळी बंदिस्त; वाचा एकूण प्रकार

Minor girl kidnapped in Goa: गोव्यातील फोंडा येथे एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

Akshata Chhatre

फोंडा: गोव्यातील फोंडा येथे एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिराेडा येथून ५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, मुलीच्या आईने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. आरोपीने आपल्या अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अज्ञात स्थळी कोंडून ठेवल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा मूळचा राजस्थानचा असून, तो फोंड्यातील फर्मागुडी येथे राहतो. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गोवा पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. पोलीस उपनिरीक्षक चेतन नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, आरोपी आणि अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.

या घटनेमुळे मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गोव्यात अशा प्रकारच्या घटना वाढताना दिसत असून, पालकांनी आपल्या मुलांच्या सुरक्षिततेबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. पोलिसांनीही अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कठोर पाऊले उचलणे आवश्यक आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासानंतरच नेमके सत्य समोर येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

Asian Games Final IND vs PAK: सुवर्णपदकाच्या सामन्यात टीम इंडियाचा दबदबा! पाकिस्तानच्या खेळाडूंनी टाकल्या नांग्या, मिळवला दिमाखदार विजय

SCROLL FOR NEXT