Goa Hit And Run Case Dainik Gomantak
गोवा

Goa Hit And Run Case: धुळेर म्हापसामध्ये 'हिट अँड रन', दुचाकी चालकाचा मृत्यू; आरोपीने काढला पळ

Goa Crime: धुळेर म्हापसामधून 'हिट अँड रन' ची घटना समोर आली आहे. धुळेर येथील काउंटो होंडा शोरमजवळ हा प्रकार घडला.

Manish Jadhav

धुळेर म्हापसामधून 'हिट अँड रन' ची घटना समोर आली आहे. धुळेर येथील काउंटो होंडा शोरमजवळ ही धक्कादायक घडली. चारचाकी वाहनाने दुचाकीला मागून धडक दिली. या अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला तर चारचाकी चालक वाहन घेऊन पळाला. या जीवघेण्या अपघातात मुबारक मतियाखान जागीच ठार झाला. चारचाकी वाहनाचा नंबर KA 22 b 5207 असा आहे. तर दुचाकीचा नंबर GA 03 Q 9013 आहे.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला आहे. पोलिसांनी चारचाकी वाहन चालकाविरुद्ध कलम 281, 105, 106(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. राज्यात अपघाताचे सत्र सुरु आहे. सातत्याने अपघाताच्या (Accident) घटना समोर येतायेत. रस्त्यांवरील खड्डे, रस्ते बांधणीचे सरकारचे चुकलेले नियोजन, दारु पिऊन गाडी चालवणे इत्यादी कारणांमुळे अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

हिट अँड रनचे वाढते प्रमाण

राज्यात मागील काही दिवसांत हिट अँड रनच्या घटना वाढल्याचे दिसून आले. मांडवी पूलावर रेंट कॅबने दिलेल्या धडकेत दुचाकी चालक पुलावरुन नदीत कोसळला. दोन दिवसानंतर नदीत कोसळलेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणी रेंट कार चालकाला अटक करण्यात आली. तसेच, हरमलमध्ये (Harmal) कारच्या दरवाजाची धडक बसल्याने आणि नंतर अंगावरुन ट्रक गेल्याने चुलत भावांचा मृत्यू झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Eco Sensitive Zone: गोवा सरकारला मोठा धक्का! जैवसंवेदनशील 22 गावे वगळण्याच्या प्रयत्नांना खो; केंद्राला हवी आणखी माहिती

Comunidade Land: बेकायदा बांधकामांचे रक्षण नको, कोमुनिदादी जाणार सुप्रीम कोर्टात; चिंचोणेत 67 प्रमुखांचा निर्णय

Margao: 'लग्न नको'! मडगावातील मुलगी सापडली कोल्हापूरात; विवाहाच्या तगाद्यामुळे घरातून काढला पळ

Goa Politics: खरी कुजबुज; बिबट्यालाही राहायला फ्लॅट हवा!

Ro Ro Ferryboat: रो-रो फेरीबोटींच्या नावावरून गोंधळ! स्थानिक नद्यांची नावे देता आली नाहीत का? अमित पाटकर यांचा सवाल

SCROLL FOR NEXT