Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: मुलीला कामावर ठेवले, महिला डॉक्टरवर गुन्हा

झारखंडमधून मुलींना पळवून त्यांना गोव्यात आणून कामाला लावणारी टोळी कार्यरत असल्याचे समोर आले

दैनिक गोमन्तक

मडगाव: झारखंडमधून मुलींना पळवून त्यांना गोव्यात आणून कामाला लावणारी टोळी कार्यरत असल्याचे समोर आले आहे. अशाच एका मुलीला आपल्या घरी कामाला ठेवल्याबद्दल फातोर्डा येथील एक महिला डॉक्टर अडचणीत आली आहे. या प्रकरणी आपल्याला अटक होणार या भीतीने त्या डॉक्टरने स्वतःला हॉस्पिसियो इस्पितळात भरती करून घेतले.मिळालेल्या माहितीनुसार या डॉक्टरने झारखंड येथील मुलीला घरकामासाठी ठेवले होते.

पण या मुलीने नंतर आपले घर गाठून आपल्याला बळजबरीने कामाला जुंपले अशी तक्रार झारखंड येथील पोलीस स्थानकावर नोंदविल्यानंतर पोलिसांनी या डॉक्टरसह अन्य संशयितांवर गुन्हा नोंद केला. या प्रकरणी झारखंड पोलीस आज त्या महिला डॉक्टरला ताब्यात घेण्यासाठी फातोर्डा येथे आले असता तिने आपण आजारी असल्याचे सांगत स्वतःला इस्पितळात दाखल केले. मिळालेल्या माहितीनुसार, या मुलीला काही जणांनी गोव्यात आणून त्या डॉक्टरकडे कामाला ठेवले होते. त्या मुलीला गोव्यात कुणी आणले आणि त्या डॉक्टरकडे कामाला तिला कुणी ठेवले याचा तपास झारखंड पोलीस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Housing Board: गृहनिर्माणकडून साखळी, थिवीत भूखंडांचा ई-लिलाव; निविदा जारी, 19 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची सूचना

IND vs WI 1st ODI: रोहित शर्मा-शुभमन गिल करणार ओपनिंग, नंबर-3 वर विराट कोहली; वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या वनडेसाठी भारताची Playing XI समोर

DA Hike: 64 टक्के महागाई भत्ता झाल्यास पगारात किती वाढ होणार? 18,000 ते 56,100 बेसिकवर पाहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

Miramar Beach Clash: व्यवसायाच्या जागेवरून वाद अन् थेट हाणामारी; मिरामार समुद्रकिनाऱ्यावर दोन गट आमनेसामने, 8 जणांविरुद्ध गुन्हा

Goa Electric Bus: नवीन इलेक्ट्रिक बसगाड्या घेण्याचा प्रस्ताव रद्द, सरकारकडे आणखी डिझेलवरील बसगाड्यांची मागणी- उल्हास तुयेकर

SCROLL FOR NEXT