Goa Crime Dainik gomantak
गोवा

Goa Crime : धनादेश न वटल्याप्रकरणी कर्जदाराला 3 महिने शिक्षा

प्रथमश्रेणी न्यायालयाने दिलेला निवाडा योग्य असल्याने त्यामध्ये हस्तक्षेप न करता कायम करण्यात येत असून आव्हान अर्ज फेटाळण्यात येत असल्याचे सत्र न्यायालयाने निवाड्यात म्हटले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji : कर्जाच्या हप्त्याचा धनादेश न वटल्याप्रकरणी प्रथमश्रेणी न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला आव्हान दिलेला पुष्पा गडेकर यांचा अर्ज उत्तर गोवा सत्र न्यायालयाने फेटाळून तीन महिन्यांची शिक्षा कायम केली आहे. या शिक्षेव्यतिरिक्त त्याना ३७ लाखांची भरपाई गोवा राज्य सहकार हाऊसिंग फायनान्स अँड फेडरेशनला द्यावी अन्यथा आणखी २० दिवसांची साधी कैदेची शिक्षा भोगावी लागेल असे निवाड्यात स्पष्ट केले आहे.

अर्जदाराने फेडरेशनकडून कर्ज घेतल्याचे व ती केलेल्या करारानुसार भरले नसल्याचे प्रथमश्रेणी न्यायालयातील खटल्यावेळी सिद्ध झाल्याने पुष्पा गडेकर हिला नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कायद्याच्या कलम १३८ खाली तीन महिन्यांची शिक्षा दिली होती. तसेच २८.५० लाख भरपाई ६ टक्के व्याजाप्रमाणे पाच वर्षांसाठी मिळून ३७ लाख ५ हजार रुपयांची रक्कम २१ फेब्रुवारी २०२२ पासून एका महिन्यात जमा करण्याचा आदेश दिला होता.

या आदेशाला गडेकर यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. प्रथमश्रेणी न्यायालयाने दिलेला निवाडा योग्य असल्याने त्यामध्ये हस्तक्षेप न करता कायम करण्यात येत असून आव्हान अर्ज फेटाळण्यात येत असल्याचे सत्र न्यायालयाने निवाड्यात म्हटले आहे.

राज्य सहकार हाऊसिंग फायनान्स अँड फेडरेशनने पुष्पा गडेकर हिला कर्ज दिले होते. त्यासंदर्भातचा करार तसेच अटी त्यांना समजावून सांगितल्या होत्या. काही दिवस कर्जाचे हप्ते वेळेवर भरल्यानंतर हे हप्ते वेळोवेळी भरण्यात येत नव्हते. कर्जदाराला अनेकदा नोटीस बजावून हप्ते भरण्यात सांगण्यात आले होते. कर्जदाराने फेडरेशनला २८.५० लाखांचा आरबीएल बँकेचा धनादेश दिला होता. तो धनादेश न वटता परत आला होता.

कर्जदाराला धनादेश परत आल्याची नोटीस देण्यात आल्यावर त्यानी ३० दिवसांची मुदत मागितली होती. मात्र तरीही ती रक्कम न भरण्यात आल्याने फेडरेशनने कलम १३८ खाली न्यायालयात तक्रार दाखल केली. ही तक्रार कायद्यानुसार सर्व प्रक्रिया करूनच करण्यात आल्याचा मुद्दा मांडण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT