Goa car dispute assault Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: गाडी मागे घेण्यावरून वाद पेटला, दगडफेक करून पर्यटकांना मारहाण; काचेच्या बाटलीने स्वतःलाही केले जखमी

Kolhapur tourists attacked Goa: कोल्हापूरहून आलेल्या तीन पर्यटकांना मारहाण करण्यात आली, ज्यात तिघे गंभीर जखमी झाले आहेत

Akshata Chhatre

म्हापसा: गोव्याच्या करासवाडा भागातील गोठणीचा व्हाळ येथे शनिवारी (दि. १३) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एका क्षुल्लक वादातून हाणामारीचा गंभीर प्रकार घडला. यात कोल्हापूरहून आलेल्या तीन पर्यटकांना मारहाण करण्यात आली, ज्यात तिघे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

नेमकी घटना काय घडली?

कोल्हापूर येथील गणेश वाठारे आणि आलफे नदाफ हे आपल्या दोन सहकाऱ्यांसह गोव्यात फिरण्यासाठी आले होते. त्यांची गाडी गॅरेजमधून बाहेर काढताना एका स्थानिकासोबत त्यांचा वाद झाला. हा शाब्दिक वाद इतका विकोपाला गेला की, स्थानिकाने थेट पर्यटकांवर हल्ला चढवला. संशयित आरोपी रशीद सिद्धकी महम्मद याने रागाच्या भरात गाडीवर मोठा दगड फेकून वाहनाचे नुकसान केले. त्यानंतर त्याने गोंधळ घालत काचेची बाटली फोडून स्वतःलाही जखमी केले, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

पोलिसांनी तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली

घटनेची माहिती मिळताच कोलवाळ पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने जखमी झालेल्या पर्यटकांना आणि संशयित रशीदला म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

गणेश वाठारे आणि आलफे नदाफ यांना डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी गोमेकॉ (GMC) रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी संशयित रशीदला ताब्यात घेतले असून पुढील तपास कोलवाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक करत आहेत. या घटनेतील पर्यटकांची कार आणि संशयिताची दुचाकी दोन्ही वाहने पोलिसांनी पुढील तपासणीसाठी जप्त केली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Theft: ‘आवाज केला तर ठार मारू’! म्हापशातील चोरीने गोवा हादरला; चोरांनी चहा पिला, फळे खाल्ली, टॅक्सीने गाठले कर्नाटक; वाचा घटनाक्रम..

दुसऱ्या महायुद्धामुळे व्यथित झालेल्या महात्मा गांधींनी हुकूमशहा हिटलरला लिहली होती दोन पत्रं; काय लिहलं होतं पत्रात? वाचा

Battle of Longewala: 1971 चा रणसंग्राम; एका रात्रीत पाकिस्तानच्या 36 रणगाड्यांचा खात्मा! काय आहे 'लोंगेवाला युद्धा'ची कहाणी?

Goa Cyber Crime: मोठा परतावा देण्याचं आमिष दाखवून 1.52 कोटींचा गंडा, सायबर फसवणूक प्रकरणी मुंबईतून एकाला अटक; गोवा पोलिसांची कारवाई!

IND vs WI 2nd Test: 38 वर्षांपासून एकही पराभव नाही, 'दिल्ली'चं मैदान टीम इंडियासाठी लकी; जाणून घ्या काय सांगते आकडेवारी?

SCROLL FOR NEXT