Goa Drugs Seized:  Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Seized: गोवा क्राईम ब्रँच पथकाचा छापा; 5 लाख रूपयांचे अमली पदार्थ जप्त, उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्याला अटक

म्हापशात कारवाई

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Drugs Seized: गोवा पोलिसांच्या क्राईम ब्रँच पथकाने शुक्रवारी केलेल्या कारवाईत 5 लाख रूपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या छाप्यात एकाला अटकही करण्यात आली आहे. म्हापशातील ग्रीन पार्क हॉटेलजवळ उड्डाणपुलाच्या खाली ही कारवाई करण्यात आली.

क्राईम ब्रँचच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर पोलिस निरीक्षक लक्षी आमोणकर, इर्शाद वाटंगी, संजय गांवकर, कल्पेश शिरोडकर, नवीन पालयेंकर, साईनाथ कोपार्डेकर आणि विनायक सावंत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

या नार्कोटिक छाप्यात अवधेशकुमार श्यामबिहारी राम (वय 35 वर्षे) याला अटक करण्यात आली आहे. तो मूळचा विकासखंड, बस्ती, भलिया, उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे. तो शेतकरी आहे, असे कळते. त्याच्याकडे 5 किलो गांजासदृश्य पदार्थ आढळून आला आहे.

त्याची बाजारातील किंमत 5 लाख रूपये इतकी आहे. पोलिस निरीक्षक नॅथन अल्मेडा यांच्या देखरेखीखाली पुढील तपास केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कष्टकरी वर्गाच्या आवाजाला मिळाली ताकद, झोहरान ममदानी ठरले आशेचे प्रतीक - संपादकीय

NSA In Goa : गुन्हेगारी कृत्यांवर वचक ठेवण्यासाठी गोवा सरकारने उचलले मोठे पाऊल, राज्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू

Goa Today's News Live: गिरीमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटली

Goa Politics: खरी कुजबुज; युतीचा आवेश संपला का?

बोहल्यावर चढण्यापूर्वीच काळाने गाठले, परदेशातून लग्नासाठी गोव्यात आलेल्या ‘लिओ’चा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT