arrests suraj pendse Dainik Gomantak
गोवा

प्रदूषण नियंत्रण मंडळाचा 'फेक' अधिकारी अटकेत! लाखोंची फसवणूक करणारा 'सुरज' पुण्यातून जेरबंद; गोवा पोलिसांची कारवाई

Goa Crime Branch: प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अधिकारी असल्याचे भासवून लाखो रुपये लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुण्यातून अटक केली.

Manish Jadhav

पणजी: गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका मोठ्या फसवणुकीच्या प्रकरणाचा छडा लावत राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अधिकारी असल्याचे भासवून लाखो रुपये लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुण्यातून अटक केली. सुरज विवेक पेंडसे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सरकारी अधिकाऱ्याचे बनावट रुप धारण करुन सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या या आरोपीने एका तक्रारदाराला तब्बल 5.03 लाख रुपयांचा चुना लावल्याचे तपासात उघड झाले.

आरोपी सुरज पेंडसे याने तक्रारदाराशी संपर्क साधून आपण गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अधिकारी असल्याचे खोटे सांगितले होते. मंडळाशी संबंधित विविध कामांसाठी त्याने तक्रारदाराकडून वेळोवेळी पैसे उकळले. विश्वास संपादन करण्यासाठी त्याने चक्क प्रदूषण नियंत्रण मंडळाची बनावट संमती पत्रे आणि पावती पुस्तके तयार केली होती. ही बनावट कागदपत्रे तक्रारदाराला देऊन त्याने सर्व कामे अधिकृतपणे पूर्ण झाल्याचा आभास निर्माण केला. मात्र, या कागदपत्रांची पडताळणी केली असता ही सर्व कागदपत्रे आणि पावत्या बनावट असल्याचे समोर आले, ज्यानंतर तक्रारदाराने पोलिसांत धाव घेतली.

गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तांत्रिक तपास सुरु केला असता आरोपी पुण्यात लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान पोलीसही थक्क झाले, कारण सुरज पेंडसे हा केवळ या एकाच प्रकरणापुरता मर्यादित नव्हता. त्याच्याविरोधात गोव्यात अशाच प्रकारच्या फसवणुकीचे आठ गुन्हे दाखल असून गोव्याबाहेर इतर राज्यांमध्येही दोन गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. सरकारी यंत्रणेच्या नावाचा गैरवापर करुन बनावट शिक्के आणि लेटरहेड तयार करण्यामध्ये हा आरोपी माहीर असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळासारख्या महत्त्वाच्या विभागाच्या नावाचा वापर करुन अशा प्रकारे फसवणूक होणे ही गंभीर बाब मानली जात आहे. सध्या गुन्हे शाखा या आरोपीकडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे. या अटकेमुळे सरकारी कामांच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळ्यांना मोठा इशारा मिळाला असून नागरिकांनी कोणत्याही सरकारी कामासाठी अधिकृत कार्यालयात जाऊनच व्यवहार करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT