Drugs  Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs : गोवा पोलीस अॅक्शन मोडमध्ये; दोन ड्रग्ज तस्करांच्या मुसक्या आवळल्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मडगावमध्ये ईएसआयएस हॉस्पिटलजवळील रस्त्यावर सापळा रचण्यात आला होता

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Drugs : सोनाली फोगट हत्या प्रकरणानंतर गोवा पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन ड्रग्ज तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहे. काल सोमवारी मध्यरात्री सिद्धेश हलगेकर आणि विनायक जुवारकर या दोघांना अटक करून त्यांच्याकडून 1 किलो 100 ग्राम गांजा जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मडगावमध्ये ईएसआयएस हॉस्पिटलजवळील रस्त्यावर सापळा रचण्यात आला होता. यात प्लास्टिकच्या पिशवीतून फळांच्या खाली लपवलेला गांजा घेऊन जात असताना क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी दोन आरोपींना रंगेहाथ अटक केली. आरोपींकडून 1 किलो 100 ग्रॅम वजनाचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींमध्ये यात सिद्धेश हलगेकर (रा. शिरवई केपे) या 23 वर्षीय तरुणासह विनायक जुवारकर या मडगाव कोंब येथे राहणाऱ्या 24 वर्षीय तरुणाचा समावेश आहे.

काही दलाल गोव्यातून तेलगंणात ड्रग्जची तस्करी करत असल्याचा संशय हैदराबाद पोलिसांना आहे. याप्रकरणी तेथील पोलिसांनी हणजुणे येथील एकाला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासासाठी हैदराबाद पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली पथक राज्यात दोन दिवसांच्या भेटीवर आले आहे. अटकेत असलेला ‘कर्लिस’चा चालक एडविन नुनीस याचीही ते चौकशी करण्याची शक्यता आहे.

गोव्यात काल सोमवारी आलेल्या हैदराबाद पोलिस पथकाने राज्याचे पोलिस महानिरीक्षक ओमविर सिंग बिष्णोई यांची भेट घेऊन घेतली. तेलगंणा व गोवा या राज्यांमधील ड्रग्ज दलाल-विक्रेते यांचे रॅकेट यासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर संध्याकाळी अंमलीपदार्थविरोधी कक्षाचे निरीक्षकांशी चर्चा करून ड्रग्जसंदर्भात माहिती घेतली. काही दिवसांपूर्वी अमलीविरोधी कक्षाने म्हापसा बसस्थानकाजवळ हैदराबादच्या तरुणाला दोन किलो गांजासह अटक केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

SCROLL FOR NEXT