Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: फुलांच्या विक्रीवरुन हाणामारी, सुरी हल्ल्यात दोघेही जखमी; कोलवाळ-चिखली जंक्शनवरील घटना

Goa Crime News: कोलवाळ येथे परस्परांवर केलेल्या सुरी हल्ल्यात दोघे फुल विक्रेते जखमी झाले. फुलांचा हार विकण्याच्या वादातून ही हाणामारी झाल्याचे सांगण्यात आले.

Manish Jadhav

म्हापसा: कोलवाळ येथे परस्परांवर केलेल्या सुरी हल्ल्यात दोघे फुल विक्रेते जखमी झाले. फुलांचा हार विकण्याच्या वादातून ही हाणामारी झाल्याचे सांगण्यात आले. जंगबहादूर (वय 50 वर्षे, रा. थिवी) आणि देवानंद माळी (वय 21 वर्षे, रा. रेवोडा) अशी जखमींची नावे आहेत. सध्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात त्या दोघांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, ही घटना शनिवारी (ता.26) राष्ट्रीय महामार्गावरील कोलवाळ-चिखली जंक्शनवर घडली. जंगबहादूर याने घटनास्थळी एका वाहन दुरुस्ती गॅरेजमध्ये फुलांचे हार विक्रीसाठी ठेवले होते. तिथेच दुचाकीवरुन पुष्पहार विकण्यासाठी देवानंद माळी हा तिथे आला होता.

हार विक्रीवरुन वाद!

देवानंद आणि जंगबहादूर यांच्यात फुलांचे हार विक्रीवरुन वाद झाला. जंगबहादूरने सुरी काढून त्याच्यावर वार केला. हा हल्ला त्याने हातावर झेलला. नंतर जंगबहादूरच्या हातातून सुरी हिसकावून घेत देवानंद याने त्याच्या हातावर आणि पाठीवर वार केले. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले. देवानंद याच्या हाताला तर बहाद्दूर याच्या पाठीवर आणि हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत.

राष्ट्रीय महामार्गावरील वाहनचालक आणि स्थानिकांनी या प्रकाराची माहिती कोलवाळ पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत दोघाही जखमींना रुग्णवाहिकेतून गोमेकॉत दाखल करण्यात आले. या प्रकरणी दोघाही जखमींनी कोलवाळ पोलिसांत परस्परविरोधी तक्रार दाखल केली आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: अनिर्बंध खनिज व्यवसायामुळे शेती व्यवसायावर संक्रात; मयेतील ग्रामस्थ भडकले

Sanguem News: 'तारीमळ'वासियांचा रस्ता होणार बंद! बेंडवाडा-सांगे पुलाचे ग्रहण सुटेना; सात वर्षे रेंगाळले काम

Women's T20 Cricket: तामिळनाडूनं गोव्याचं उडवला धुव्वा; महिला संघाचा सलग तिसरा पराभव; संजुला आणि श्रेयाची खेळी व्यर्थ!

Margao Crime: मडगाव अपहरण प्रकरणाला जुन्या वादाची किनार! ‘रुबेन’ अद्याप फरारच

Goa News: गोव्याने कॅन्सरविरोधात सरसावल्या बाह्या! स्क्रीनिंग अभियानाला गती; 1057 जणांची कर्करोग तपासणी

SCROLL FOR NEXT