Goa police | Jivba Dalvi Dainik Gomantak
गोवा

Goa police: गोवा 'ड्रग्स' प्रकरणात गुंतलेल्यांची गय केली जाणार नाही!

Goa police: दोषींवर कडक कारवाईचे निर्देश मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांना मिळाले आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa police: बार्देशातील हणजूण-वागातोर तसेच किनारी परिसरात आढळलेल्या ड्रग्स प्रकरणांमुळे गोव्याची प्रतिमा मलीन होत आहे. परिणामी दोषींवर कडक कारवाईचे निर्देश मुख्यमंत्र्यांकडून पोलिस यंत्रणेला मिळाले आहेत. त्यामुळे गैरकृत्यांत सहभागींची गय केली जाणार नाही.

यासंबंधी किनारी भागात व्यवसाय थाटलेल्या गोमंतकीय तसेच परप्रांतीय हॉटेल व्यावसायिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन म्हापसा पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी केले.

हणजूण पोलिस स्थानकात परिसरातील हॉटेल्सचे मालक, चालक तसेच व्यवस्थांपकांसोबत घेतलेल्या विशेष बैठकीत उप-अधीक्षक जीवबा दळवी बोलत होते. यावेळी, हणजुण पोलिस स्थानकाचे निरीक्षक प्रशाल देसाई तसेच उप- निरीक्षक साहील वारंग आणि झेवियर फ्रान्सिस उपस्थित होते.

आपल्या हॉटेल वा रिसॉर्टमध्ये नेमके कुठल्या प्रकारचे अतिथी येतात, त्यांना कोण कोण भेटतात. तसेच त्यांच्या इतर हालचालींवर हॉटेल व्यवस्थापनाचे लक्ष असणे आवश्यक आहे. सीसीटीव्ही द्वारे नजर ठेवावी, असेही दळवी म्हणाले.

सूचकांची माहिती गुप्त राहील!

‘नो- ड्रग्स’ चे फलक तसेच भित्तीपत्रके उपस्थित हॉटेल चालकांकडे देत प्रत्येकाने तशी भित्तीपत्रके आपापल्या हॉटेल अथवा रिसॉर्टमध्ये लावावीत, असे पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी सांगितले.

यावेळी हणजूण पोलिस स्थानकाचे निरीक्षक प्रशाल देसाई यांनी सांगितले, की परिसरात चोरीछुपे चाललेल्या ड्रग्स व्यवहारासंबंधी जो कुणी पोलिस यंत्रणेना सुचित करेल, त्यांची माहिती पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

SCROLL FOR NEXT