Goa Crime:  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: बागा येथील टिटोज लेनमध्ये 3 तरूणांचा राडा; दरवाजा, खिडकी, दुचाकी फोडली...

व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल

Akshay Nirmale

Goa Crime: गोव्यातील सुप्रसिद्ध बीच असलेल्या कळंगुट-बागा परिसरात तीन तरूणांनी दमदाटी केल्याची घटना घडली आहे. बागा येथील सुप्रसिद्ध टिटोज लेने येथे आज, शुक्रवारी पहाटे हा प्रकार घडला.

यात तीन तरूणांनी येथील एका दुकानाचा काचेचा दरवाजा आणि खिडकी काठीने आणि दगड मारून फोडला. तसेच दुकानाबाहेरील दुचाकीचेही नुकासन केले. तसेच दुकानाबाहेर बराच काळ ते आतील लोकांना बाहेर येण्यास सांगत होते.

या सर्व प्रकाराच व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून अशा लोकांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही होत आहे.

बराच काळ हा सर्व प्रकार सुरू होता. पण त्यांना तिथे अडवायला कुणीही आले नाही. यातील एका तरूणाच्या हातात मोठा बांबू होता. त्यामुळेही कुणीही त्यांच्या जवळ जायला धजावले नसेल. तरूणाने बांबूने काचेचा दरवाजा फोडला. नंतर दुसऱ्या तरूणाने थेट मोठा दगड आत मारला.

बराच काळ हे तिन्ही तरूण शिवीगाळ करून आतील लोकांना बाहेर येण्यास सांगत होते. हा प्रकार बराच काळ सुरू होता.

पण व्हिडिओ व्हायरल झाल्यावर मात्र त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलिसांनी यात तातडीने लक्ष देऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT