Goa Loksabha Voting Dainik Gomantak
गोवा

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Pramod Yadav

Goa Loksabha Voting

देशात तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा मतदान मंगळवारी (दि.०७ मे) पार पडले. यात गोव्यासह देशातील ९४ लोकसभा जागांसाठी मतदान करण्यात आले. गोव्यात दोन लोकसभा जागांसाठी पहिल्यांदाच सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे.

राज्यात 76.04 टक्के मतदानाची नोंद झाल्याची माहिती गोवा निवडणूक अधिकारी रमेश वर्मा यांनी दिली आहे.

रमेश वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 76.04 टक्के मतदानाची नोंद झाली असून, यात उत्तर गोव्यात 77.79 टक्के तर दक्षिण गोव्यात 74.47 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

निवडणूक विभागाकडे एकूण 190 तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी 38 आचारसंहिता उल्लंघन केल्याप्रकरणी दाखल केल्याची माहिती वर्मा यांनी दिली.

गोव्यात 16 मार्चपासून 17.82 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात रोख रक्कम, भेटवस्तू आणि बेकायदेशीर वस्तूंचा समावेश आहे. गोवा विधानसभेच्या 2022 साली झालेल्या निवडणूक काळात जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाच्या तुलनेत यात 40 टक्के वाढ झाली असून, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जप्त करण्यात आलेल्या वस्तूंपेक्षा 55 टक्के अधिक असल्याची माहिती वर्मा यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Bhoma Highway: 'भोम प्रकल्प' गोव्याच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा! भाजपने मानले गडकरींचे आभार

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

Goa Taxi: ..हे तर सरकारचे कारस्थान! जीएसटी नोटीसींवरुन टॅक्सीमालक नाराज

Goa University: विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव! गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल; शिष्‍टमंडळाशी चर्चा होणार

SCROLL FOR NEXT