Covid-19 vaccination Dainik Gomantak
गोवा

Covid-19 प्रिकॉशनरी डोस घेतला का? गोव्यात 11 ठिकाणी सोय, जाणून घ्या तुमच्या येथे कोठे मिळेल मोफत लस

राज्यातील विविध आरोग्य केंद्रावर पात्र नागरिकांना सुरक्षात्मक लसीचा मोफत डोस दिला जाणार आहे.

Pramod Yadav

Covishield Vaccination Campaign: चीनसह विविध देशात पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढत आहे. या पार्श्वभूमीवर भारतात देखील खबरदारी घेतली जात आहे. केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

तसेच, कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस आणि सुरक्षात्मक डोस (प्रिकॉशनरी डोस) देखील घेण्याचे आवाहन केले आहे.

गोवा सरकारने (Goa Govt) खबरदारीचा उपाय म्हणून कोव्हिशिल्ड लसीकरण मोहिम (Covishield Vaccination Campaign) हाती घेतली आहे.

उद्यापासून म्हणजेच 18 जानेवारी, 2023 या माहिमेला सुरूवात होणार आहे. याअंतर्गत राज्यातील विविध आरोग्य केंद्रावर पात्र नागरिकांना सुरक्षात्मक लसीचा मोफत डोस दिला जाणार आहे.

कोणकोणत्या आरोग्य केंद्रावर मिळणार लस

सार्वजनिक आरोग्य केंद्र काणकोण, प्राथमिक आरोग्य केंद्र साखळी, CHC पेडणे, PHC केपे, PHC फोंडा, PHC चिंबल, UHC मडगाव, UHC वास्को, UHC पणजी, UHC म्हापसा आणि GMC बांबोळी

कोणाला मिळणार लस

वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेल्या तसेच, कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला, दुसरा किंवा सुरक्षात्मक डोस घेतल्यांना लसीचा डोस दिला जाईल. डोस घेतल्यानंतर सहा पूर्ण झालेल्यांना लस दिली जाईल. दोन्ही डोस घेतलेल्यांना सुरक्षात्मक डोस दिला जाईल.

केव्हा मिळणार लस

लस देण्यासाठी आठवड्यातील दोन दिवस निश्चित करण्यात आले आहेत. बुधवारी आणि शनिवारी (सकाळी 09 ते सायंकाळी 04) यावेळेत नागरिकांना लस दिली जाईल.

लस घेण्यासाठी कोणत्याही प्राथमिक नोंदणीची गरज नसून, स्पॉट नोंदणी केली जाणार आहे. पण, लसीकरणासाठी येत असताना दुसऱ्या लसीचे प्रमाणपत्र सोबत घेऊन यावे लागेल. तसेच, मोबाईल नंबर आणि ओळखपत्र देखील सोबत घेऊन येणे बंधनकारक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भेटींचा उत्सव, मतांचा ध्यास! गणेश चतुर्थीत राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींना उधाण; दर्शनासोबत निवडणुकीच्या समीकरणांचीही चर्चा

America Iran War: 6 महिन्यांत 3.21 लाख कोटींची राखरांगोळी, फायटर जेट्स उद्ध्वस्त, अमेरिकन दूतावासांवर हल्ले; पेंटागनच्या ऑडिट रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

Horoscope 16 September 2026: नशिबाची साथ अन् अचानक जॅकपॉट! आज 'या' राशींच्या आयुष्यात घडणार मोठी उलथापालथ; करिअरमध्ये झेप घेण्याची संधी

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

SCROLL FOR NEXT