Goa Stray Dogs Dainik Gomantak
गोवा

Goa Stray Dogs: भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनात कुचराई! पालिकांना कोर्टाचा दणका; अधिकाऱ्यांवर शिस्तभंग कारवाईचे आदेश

goa court stray dogs order: भटक्या कुत्र्यांचे व्यवस्थापन, नसबंदी मोहीम आणि तात्पुरत्या निवाऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार जारी करण्यात आलेल्या उच्च न्यायालयाच्या आदेशांचे सातत्याने उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने अत्यंत कडक भूमिका घेतली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: भटक्या कुत्र्यांचे व्यवस्थापन, नसबंदी मोहीम आणि तात्पुरत्या निवाऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार जारी करण्यात आलेल्या उच्च न्यायालयाच्या आदेशांचे सातत्याने उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. न्यायालयाच्या आदेशांचे पालन न करणाऱ्या नगरपालिकांचे मुख्य अधिकारी, महापालिका आयुक्त यांच्यावर तातडीने शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने नगरपालिका प्रशासन संचालकांना दिले आहेत.

न्यायालयाने स्पष्ट केले की, संबंधित अधिकाऱ्यांची ही दुर्लक्षता आणि निष्काळजीपणा न्यायालयीन कामकाजात अडथळा निर्माण करत आहे. त्यामुळे या सर्व अधिकाऱ्यांच्या सेवा रेकॉर्डमध्ये या शिस्तभंगाच्या कारवाईची नोंद करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यांच्यावर न्यायालयाच्या अवमान कायद्यानुसार स्वतंत्र कारवाई करण्याचा मार्ग खुला ठेवण्यात आला आहे.

बैठकीला न्यायालयीन मित्रही राहणार उपस्थित

न्यायालयाने (Court) निर्देश दिले आहेत की, पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय सेवा संचालनालयाच्या २७ ऑक्टोबर रोजी आयोजित सर्व भागधारकांच्या बैठकीत विविध संस्था, शाळा किंवा शैक्षणिक संकुलांमधून हटवण्यात आलेल्या भटक्या कुत्र्यांच्या पुनर्वसनाचा मुद्दा प्रमुख अजेंडा असला पाहिजे. या कुत्र्यांना मोकाट सोडता येत नाही आणि सध्या त्यांच्यासाठी निवारे उपलब्ध नसल्याने, नसबंदी केलेल्या या कुत्र्यांना कुठे ठेवावे आणि त्यांचे पुनर्वसन कुठे करावे, यावर तातडीने निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरवर्षी सुमारे १८,००० कुत्र्यांवर नसबंदी करण्याची क्षमता बिगर सरकारी संस्थांमध्ये आहे, अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली. या मोहिमेला योग्य दिशा देण्यासाठी न्यायालयाने न्यायालयीन मित्राला २७ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० वाजता आणि सकाळी ११:३० वाजता होणाऱ्या बैठकांना उपस्थित राहून सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहे.

पंचायत सचिनवांवरही होईल शिस्तभंग कारवाई

पंचायत संचालकांनी न्यायालयात सादर केलेल्या तक्त्यावरून अनेक पंचायतींनी अद्याप आदेशांचे पालन केले नसल्याचे समोर आले. खंडपीठाने आदेशांचे अनुपालन न केलेल्या पंचायतींच्या सचिवांना आवश्यक अहवाल सादर करण्याचे अंतिम निर्देश दिले आहेत. या मुदतीनंतरही आदेश न मानणाऱ्या सचिवांवर थेट शिस्तभंगाची कारवाई करून त्याचा अहवाल न्यायालयाला सादर करण्याचे निर्देश पंचायत संचालकांना देण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rohit Sharma T20 Comeback: '2027 च्या वर्ल्ड कपनंतर टी-20 क्रिकेटमध्ये कमबॅक!' रोहित शर्माच्या विधानाने चर्चेला उधाण, हिटमॅन नेमकं काय म्हणाला? Watch Video

Generations History: सायलेंट जनरेशन, बेबी बूमर्स ते जेन झी आणि अल्फा; बदलत्या पिढ्यांचा रंजक इतिहास अन् तरुण पिढीचा डिजिटल उठाव!

Goa Administration: शिपाई झालेत 'बॉस'! शिपायांच्या मुजोरीवरुन मुख्यमंत्र्यांची प्रशासनाला तंबी; राजकीय वशिला आणि कामचुकारपणा चालणार नाही

Harry Kane Wins Ballon DOr: हॅरी केनने जिंकला बॅलन डी'ओर पुरस्कार! 25 वर्षांनंतर इंग्लंडच्या फुटबॉलपटूचा ऐतिहासिक सन्मान, एम्बाप्पे, मेस्सीसारख्या दिग्गजांना टाकले मागे

खरी कुजबुज: चहापेक्षा किटली गरम

SCROLL FOR NEXT