Goa Court Dainik Gomantak
गोवा

Goa Court: पीडित तरुणीशी विवाह केल्याने अखेर गुन्हा रद्द

अनेक दखलपात्र गुन्हे : गोवा खंडपीठाने संशयिताला ठोठावला 10 हजारांचा दंड

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Court विविध दखलपात्र गुन्ह्यांप्रकरणी पीडित तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतर याचिकादार (संशयित) वेद प्रकाश सोनी याने त्या तरुणीशी महिन्याभरातच विवाह केला आणि तक्रार रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती.

त्याने विवाहाचा दाखला सादर केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने ही तक्रार रद्द करण्याचा आदेश जारी करताना संशयिताला 10 हजारांचा दंड ठोठावला.

विवाहानंतर तरुणीने दाखल केलेली तक्रार रद्द करण्यास हरकत नसल्याचे लेखी हमीपत्र सादर केले. त्या हमीपत्राच्या आधारे संशयिताने विवाह नोंदणीचा दाखला सादर करत त्याच्याविरुद्ध वेर्णा पोलिसांत दाखल असलेली तक्रार रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका सादर केली होती.

दंडाची रक्कम प्राधिकरणाला-

याचिकादाराने 10 हजारांचा दंड जमा करण्यास सहमती दाखवली. ही दंडाची रक्कम गोवा राज्य कायदा सेवा प्राधिकरणाला द्यावी.

हा गुन्हा रद्द करण्यास पोलिसांची हरकत नसल्याचे सरकारी वकिलांनी स्पष्ट केले. त्यानुसार गोवा खंडपीठाने वेर्णा पोलिस स्थानकात याचिकादाराविरुद्ध दाखल केलेला गुन्हा रद्द केला.

संमतीनेच लग्न-

विवाह केल्याने संशयिताशी कोणताही वाद नाही, अशी शपथ मुलीने नोटरीसमोर घेतल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले होते.

संशयित व पीडिता यांच्यात कोणतेही हेवेदावे नसून दोघांच्या संमतीनेच हा विवाह केल्याचे न्यायालयात उघड केले. त्यामुळे याचिकादाराविरुद्ध वेर्णा पोलिसांत असलेली तक्रार रद्द करणे योग्य होईल, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

विवाहास नकार दिल्याने तक्रार

पीडित तरुणी आणि संशयित यांच्यात मैत्री होती. त्यातून त्यांचे प्रेमसंबंध जुळले. मात्र, संशयिताने विवाह करण्यास नकार दिल्याने तरुणीने वेर्णा पोलिस स्थानकात 14 ऑक्टोबर 2022 रोजी तक्रार दाखल केली होती.

गुन्हा दाखल होताच संशयिताने पीडितेशी विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवला आणि त्याने उत्तर प्रदेशमध्ये तिच्याशी विवाह नोंदणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT