अन्वर, Goa. Gomantak
गोवा

Goa : अन्वरला न्यायालयाची नोटीस

Goa : ३१ रोजी सुनावणी, पोलिसांना मृतांचा पुरावा द्यावा लागणार

Sanjay Ghugretkar

मडगाव ः (Madgaon -Goa) सावनूर (Savnoor) येथे खून करण्यात आल्याने सध्या चर्चेत असलेला कुख्यात गुंड टायगर अन्वर (Anwar) याचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्याच्यावर आर्लेम येथे झालेल्या खुनी हल्ला प्रकरणात साक्ष देण्यासाठी त्याने ३१ ऑगस्ट रोजी न्यायालयात उपस्थित राहावे, अशी नोटीस दक्षिण गोवा (South Goa)अतिरिक्त सत्र न्यायालयाने जारी केली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्हिन्सेंट डिसिल्वा यांनी काल मंगळवारी ही नोटीस जारी केली आहे. आता या प्रकरणातील तक्रारदार असलेला अन्वर मृत झाला आहे, हे अभियोग पक्ष आणि फातोर्डा पोलिसांना न्यायालयाला कागदोपत्री पुराव्यासह पटवून द्यावे लागणार आहे. सहा महिन्यांपूर्वी अन्वरवर व्हेली डिकॉस्ता गँगकडून त्याच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला होता. व्हेली डिकॉस्ता याची गॅंग सावर्डे कुडचडे परिसरात बेकायदेशीर रेती व्यवसायात गुंतली असताना त्यांच्या या धंद्यात अन्वर नाक खुपसू पाहत होता. या प्रकरणातून हा हल्ला करण्यात आला होता, असे सांगण्यात येते. या प्रकरणात व्हेली डिकॉस्ता व रिकी होर्णेकर यांच्यासह सहा जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणातील प्रमुख संशयितांपैकी एक असलेल्या रिकी होर्णेकर याला जामिनावर मुक्त करण्यात आले.

गुन्ह्यांचे काय होणार?
खुनी हल्ले, मारहाण, अपहरण, धमक्या देणे, खंडण्या वसूल करणे अशा अनेक गुन्ह्यात समावेश असलेल्या अन्वरवर दक्षिण गोव्यात ५ पोलिस स्थानकावर २६ गुन्हे नोंद आहेत. अन्वर मृत पावल्याने आता या सर्व गुन्ह्यांची फाईल बंद होणार असली तरी काही प्रकरणात त्याच्याबरोबर अन्य साथीदार गुंतले आहेत. त्यांच्यावर मात्र सुनावणी चालू राहणार आहे. केपे येथील एका मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कारकेल्या प्रकरणी सध्या सध्या मडगाव सत्र न्यायालयात सुनावणी चालू आहे. अन्वरच्या अन्य तीन साथीदारावर हा खटला चालू राहणार. त्यापूर्वी शेल्डे येथील एका मटकेवाल्याचे अपहरण करून त्याला मारहाण करून पाय मोडल्या प्रकरणी कुडचडे पोलिसांनी अन्वर व त्याच्या अन्य दोन साथीदारावर खुनाचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्याखाली आरोपपत्र दाखल केले आहे. हाही खटला चालू राहणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT