Goa High Court  Dainik Gomantak
गोवा

Goa Court : भाटी पंचायतीला बजावली न्‍यायालयाने अवमान नोटीस

Goa Court: कचरा विल्हेवाटीसाठी ‘एमआरएफ’ सुविधा उभारण्‍यास हलगर्जीपणा

Ganeshprasad Gogate

Goa Court : कचरा विल्हेवाटीसाठी राज्यातील सर्व पंचायतींना एमआरएफ सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिले होते.

भाटी पंचायतीला दिलेल्या ठराविक वेळेत या सुविधा उपलब्ध न केल्याप्रकरणी खंडपीठात पंचसदस्यांनी जमा केलेले 5 लाख रुपये जप्त करण्याचे निर्देश देऊन सरपंच व सचिवांना आज अवमान नोटीस जारी केली आहे.

या कचरा विल्हेवाटीसंदर्भातच्या स्वेच्छा याचिकेवरील पुढील सुनावणी येत्या बुधवार दि. 28 फेब्रुवारीला ठेवण्यात आली आहे.

राज्यातील बहुतेक पंचायतींनी एमआरएफ सुविधा उपलब्ध केल्या आहेत. मात्र हणदोणे व भाटी या दोनच पंचायतींनी ती उभारली नव्हती.

त्यामुळे मागील सुनावणीवेळी खंडपीठाने हणदोणे पंचायतीला 15 फेब्रुवारीपर्यंत त्यासाठी मुदत दिली होती. या पंचायतीने आणखी वेळ वाढवून देण्यासाठी केलेला अर्ज मान्य केला.

भाटी पंचायतीने ही सुविधा उभारण्यासाठी वेळ वाढवून देण्यासाठी अर्ज केला नाही, तसेच ती न उभारण्यामागे कोणती समस्या आहे याचीही माहिती खंडपीठासमोर सादर केली नाही.

पंचायतीच्या या बेफिकिरपणामुळे खंडपीठात यापूर्वीच भाटी पंचसदस्यांना 5 लाख रुपये जमा करावे लागले होते, ते जप्त करण्याचा आदेश न्‍यायालयाने दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT