Goa | Grain Theft Dainik Gomantak
गोवा

Goa: 'त्या' धान्यसाठ्याची चोरी झाली कशी? तर संशयितांना अटकपूर्व जामीन मंजूर...

Goa: सरकारी गोदामातील धान्यसाठा चोरीप्रकरणाला आता वेगळे वळण आले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa: सरकारी गोदामातील कथित धान्यसाठा चोरीप्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. पोलिसांनी न्यायालयात ही चोरी सरकारी गोदामातून झाल्याचा निष्कर्ष काढून संशयितांच्या अटकपूर्व जामिनाला विरोध केला होता. तर नागरी पुरवठा खात्याने गोदामातून चोरी झालीच नाही, असे पत्रच क्राईम ब्रँचला दिले आहे.

दरम्यान, या विसंगतीमुळे पणजी अतिरिक्त सत्र न्यायालयाने सचिन नाईक बोरकर व वीरेंद्र म्हार्दोळकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्यामुळे धान्याची चोरी कोठून झाली? हे आता क्राईम ब्रँचलाच स्पष्ट करावे लागणार आहे.

क्राईम ब्रँचने 14 नोव्हेंबरच्या रात्री धडक कारवाई करून धान्यसाठा ट्रकामध्ये भरून तो कर्नाटकला नेला जाण्याच्या तयारीत असताना तीन ठिकाणी छापे टाकून सुमारे 10 लाखांचा माल जप्त केला होता. याप्रकरणी वाहनांच्या चालकांना तसेच धान्यसाठा खरेदी केलेल्या कर्नाटकच्या कंत्राटदाराला अटक केली होती.

न्यायालयाने दोन दिवसांच्या कोठडीनंतर ठोस काही पुरावे नसल्याने त्यांची जामिनावर सुटका केली होती. त्यांना जामीन मिळेपर्यंत मुख्य सूत्रधार सचिन नाईक बोरकर व वीरेंद्र म्हार्दोळकर हे फरारी होते. मात्र, न्यायालयाने काल त्यांना जामीन मंजूर केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT