Goa Tourism| Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: किनाऱ्यावर बेकायदा लाकडी पलंग; पोलिसांचे अतिक्रमणाकडे दुर्लक्ष

Goa: व्यावसायिकांनी पर्यटन खात्याकडून कसल्याच प्रकारचे परवाने न घालता घेता शेकडो लाकडी पलंग टेबल्स घालून किनाऱ्यावर अतिक्रमण केले

दैनिक गोमन्तक

Goa Tourism: पर्यटन हंगामात विठ्ठलदासवाडा, मोरजी किनारी भागात मोठ्या प्रमाणात बिगर गोमंतकीय व्यावसायिकांनी पर्यटन खात्याकडून कसल्याच प्रकारचे परवाने न घालता घेता शेकडो लाकडी पलंग टेबल्स घालून किनाऱ्यावर अतिक्रमण केले आहेत.

या अतिक्रमणावर कारवाई केल्यानंतर लगेच त्यांचे पलंग परत कसे केले जातात? या प्रकारावर कडक कारवाई करावी, अशी स्थानिकांची मागणी आहे.

मोरजी पंचायत क्षेत्रातील किनारी भागात सध्या विठ्ठलदासवाडा या ठिकाणी खाजगी जमिनीमध्ये रेस्टॉरंट क्लब उभारलेले आहेत.

या रेस्टॉरंट क्लबसाठी किनाऱ्यावर लाकडी पलंग घालण्यासाठी पर्यटन खात्याकडून परवाने घेणे आवश्यक असते आणि पर्यटन खाते केवळ या व्यावसायिकांना पाच जोड्या लाकडी पलंग घालण्यासाठी मुभा देते.

किनारी भागावर जे शॅक व्यावसायिक पर्यटन खात्याकडून परवाने देऊन व्यवसाय करतात, त्यांना मात्र दहा जोड्या, एकूण वीस लाकडी पलंग घालण्याची मुभा असते.

खाजगी जागेतील शॅक व्यावसायिक, रेस्टॉरंट व्यावसायिकांनी शेकडो विनापरवाना लाकडी पलंग घालून किनारा व्यापून टाकलेला आहे. सायंकाळी दुपारी पर्यटक जर समुद्रकिनाऱ्यावर समुद्राच्या पाण्यात आपला वेळ घालवण्यासाठी जात असेल, तर त्यांनाही लाकडी पलंग अडचणी ठरत आहे.

...कारवाईची गरज!

लाकडी पलंगावर दोन वेळा पर्यटन खात्याने कारवाई केली होती, परंतु त्यानंतर लगेच हे लाकडी पलंग व्यावसायिकांना घरपोच केले. हा प्रकार वारंवार कसा काय घडतो, या पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यावर राजकीय दबाव आहे की काय?

अशी शंका स्थानिकांकडून उपस्थित केली जात आहेत. शेकडो लाकडी पलंग घालून अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकावर कारवाई का नाही? असा सवाल ग्रामस्थ संजय कोले यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT