Goa Bus Dainik Gomantak
गोवा

Goa महामंडळाकडून जुन्या बसचा वापर; प्रवाशांचे प्रचंड हाल!

Goa: बसेस मुख्य रस्त्याने न जाता वन आणि अभयारण्य परिसरातून जातात.

दैनिक गोमन्तक

Salcete: कोल्हापूर, बेळगाव, हुबळी, सोलापूरसारख्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी कदंब परिवहन महामंडळातर्फे जुन्या बसचा वापर केला जात आहे. त्यामुळे या बसेस मध्येच बिघडतात व प्रवाशांचे हाल होतात. या सर्व प्रकारामुळे लांब पल्ल्याच्या अंतरासाठी नवीन व सुस्थितीतील बसेसचा वापर करावा, अशी प्रवाशांकडून मागणी होत आहे.

23 रोजी मडगावहून बेळगावाला जाणारी व सकाळी 7.30 वाजता सावर्डेमार्गे सुटलेल्या बसचा टायर अनमोड इथे पंक्चर झाला. तरी चालक व वाहकाने मिळून टायर बदलला. 24 रोजी दुपारी एक वाजता बेळगावहून मडगावला येणाऱ्या बसचा अनमोड इथेच पावर स्टियरिंगचा ऑईल पाईप फुटल्याने तिथेच थांबावे लागले. यात लोकांचे हाल झाले.

दरम्यान, या बस मुख्य रस्त्याने न जाता वन व अभयारण्य परिसरातून का जातात, हे कळणे कठीण आहे. अभयारण्यातून जाणारा रस्ता अरुंद तर आहेच शिवाय खानापूरपर्यंतचा 20 किमी अंतराचा रस्ता एकदम खराब आहे.

आमदार व कदंब परिवहन महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांच्या कानावर ही बाब घातली तेव्हा त्यांनी सांगितले की, गेल्या 8 वर्षांत एकही नवीन बस खरेदी केलेली नाही. बसमध्ये अधूनमधून बिघाड होतो याची आपल्याला कल्पना आहे.

आणखी 150 नवीन बसचा ताफा येणार असून त्यानंतर त्या बसेसचा वापर लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी केला जाईल. तोपर्यंत प्रवाशांनी संयम बाळगावा. बसेस डेपोबाहेर काढताना चाचणी करणे आवश्यक आहे. जर कुठेही गलथानपणा आढळला तर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

बसेसची चाचणी होत नाही

काही बसचे टायर एकदम गुळगुळीत असतात. तसेच बसण्याच्या सीट्सही तुटलेल्या असतात. बसेस डेपोबाहेर काढतानाही त्यांची चाचणी व्यवस्थित केली जात नाही. जर बसमध्येच बिघडली तर तेथील मॅकानिकला बोलवावे लागते किंवा कदंबतर्फे बदली बस येईपर्यंत प्रवाशांना थांबावे लागते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT