Govind Gawde While Starting the Work. Dainik Gomantak
गोवा

सातेरी देवस्थानाकडील पायवाट बांधणीस क्रीडामंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

श्री सातेरी देवस्थान ते बाजार या रस्त्यासाठी पर्यायी रस्ता हवा.

गोमन्तक डिजिटल टीम

सावईवेरे : वेरे - वाघुर्मे ग्रामपंचायत क्षेत्रातील मधलावाडा येथील श्री सातेरी देवस्थानाकडील पायवाटेची बांधणी करण्यात येणार असून त्याचा शुभारंभ प्रियोळचे आमदार तथा क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते भूमिपूजनाने झाला.

यावेळी सरपंच शोभा पेरणी, उपसरपंच बाबू गावडे, पंचसदस्य अक्षय नाईक, लोचन नाईक, नवनाथ वेलकासकर, रोहन तारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी गोविंद गावडे म्हणाले की, प्रियोळ मतदारसंघात ज्या पायवाटा किंवा छोटे रस्ते आहेत, त्यांची डागडुजी होणे महत्त्वाचे असून त्या दृष्टीने पंचायती प्रयत्नशील आहेत. श्री सातेरी देवस्थान ते बाजार या रस्त्यासाठी पर्यायी रस्ता हवा.

त्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. गावाचा विकास होण्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य महत्त्वाचे असते. असे सहकार्य मिळाल्यास बरीच विकासकामे मार्गी लागू शकतील. यावेळी गावडे यांनी, स्वच्छतेचे महत्त्व विषद करून याची सर्व जबाबदारी ग्रामपंचायतीवर न टाकता आपलेही स्वच्छतेबाबत काही कर्तव्य आहे, याची जाणीव प्रत्येक नागरिकाने ठेवावी, असे आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT