Amit Patkar Criticized BJP Government Dainik Gomantak
गोवा

Amit Patkar Criticized BJP Government: 'भाजप सरकारची हिटलरला लाजवेल, अशी मुजोरशाही सुरु'; अमित पाटकर यांचा घणाघात

Amit Patkar: सद्यस्थिती पाहता भाजप सरकारचा कारभार दिशाहीन झाल्यासारखा वाटतो. पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांची कदर करण्याऐवजी बाहेरच्यांना आणून उमेदवारी दिली जात आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress state president Amit Patkar Criticized BJP Government:

सद्यस्थिती पाहता भाजप सरकारचा कारभार दिशाहीन झाल्यासारखा वाटतो. पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांची कदर करण्याऐवजी बाहेरच्यांना आणून उमेदवारी दिली जात आहे. भाजप सरकारची हिटलरला लाजवेल, अशी मुजोरशाही सुरू असून विरोधकांना संपवण्याचे षडयंत्र रचले जात आहे, असा आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी फोंडा येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत केला.

यावेळी दक्षिण गोव्याचे उमेदवार कॅप्‍टन विरियातो फर्नांडिस, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता, कॉंग्रेसचे सरचिटणीस सावियो फर्नांडिस, फोंड्यातील नेते राजेश वेरेकर, गोवा फॉरवर्डचे नेते दुर्गादास कामत, गटाध्यक्ष विलियम आगियार आणि मान्यवर उपस्थित होते.

सध्या राज्यात दंडेलशाही सुरू असल्यामुळे लोक उघडपणे बोलायला घाबरतात; पण त्यांच्या मनाचा कानोसा घेतल्यास ते विद्यमान सरकारला धडा शिकवण्‍यास बघत आहेत, असे डिकॉस्ता म्हणाले. फोंडा मतदारसंघातून कॉंग्रेसच्या उमेदवाराला भरपूर मताधिक्‍य मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी साहित्यिक एन. शिवदास यांनी तृणमूल कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. सावियो फर्नांडिस यांनीही मनोगत व्यक्त केले. सुरुवातीला सर्व नेत्यांनी विठोबा देवालयाला भेट दिली. सूत्रसंचालन अरुण गुडेकर यांनी केले, तर शेख शब्बीर यांनी आभार मानले.

चार मंत्री, तरीही तालुका ‘अनाथ’

फोंड्याचे कॉंग्रेस नेते राजेश वेरेकर म्हणाले, फोंड्यात अनेक समस्या असून उपजिल्हासारख्या सरकारी इस्पितळात सुविधा नसल्यामुळे गंभीर रुग्णांना गोवा मेडिकल कॉलेजमध्ये जावे लागत असून त्यात प्राणहानीही होत आहे. फोंडा तालुक्यात चार मंत्री असूनसुध्दा हा तालुका ‘अनाथ’ झाल्यासारखे वाटते, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

AC Compressor Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू; पालकांचा काळीज पिळवटणारा आक्रोश VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

Goa Crime: 'त्या' नराधम बापाला कोर्टाचा मोठा दणका! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ठोठावली 20 वर्षांची शिक्षा; 1.30 लाखांचा दंड

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

SCROLL FOR NEXT