Goa Congress | Yuri Alemao  Dainik Gomantak
गोवा

Goa Congress : भाजपची असंसदीय भाषा ; काँग्रेस कार्यकर्ते संतापले

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News : पणजी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना ‘नव्या युगाचा रावण’ म्हटल्याने संतापलेल्या कॉंग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता.६) पणजीत काँग्रेस हाउससमोर निदर्शने केली. संसदीय लोकशाही असलेल्या देशात एखाद्या नेत्याविरोधात असंसदीय भाषा वापरणे भाजपला शोभा देत नाही.

यातून भाजपने आपली पातळी दाखवून दिली आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली.यावेळी आमदार एल्टन डिकॉस्ता, डॉ. प्रमोद साळगावकर, माजी आमदार लवू मामलेदार, अन्य नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपने गुरुवारी आपल्या सोशल मीडियावर राहुल गांधींचा फोटो पोस्ट केला आणि त्यांना ‘नव्या युगाचा रावण’ म्हटले. त्यांनी लिहिले आहे, नव्या युगाचा रावण आला आहे. ते दुष्ट आहेत, धर्माविरुद्ध आहेत आणि रामाच्या विरोधात आहेत.

देश नष्ट करणे हेच त्यांचे एकमेव ध्येय आहे. भाजपने आपल्या सोशल मीडिया हँडलवर जारी केलेल्या पोस्टरमध्ये राहुल गांधींना ७ डोकी दाखवण्यात आली आहेत. त्यावर लिहिले आहे- भारत खतरे में है. फोटोच्या खाली मोठ्या अक्षरांत ‘रावण’ लिहिले आहे.

याच्या खाली इंग्रजीमध्ये जॉर्ज सोरोसद्वारे दिग्दर्शित काँग्रेस पार्टी प्रॉडक्शन लिहिले आहे. या कृत्याचा काँग्रेसने निषेध केला आहे.

राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो यात्रा’ काढली. लोकांच्या संवेदना, दुःख जाणून घेतले. त्याचा एक सकारात्मक परिणाम देशव्यापी होत आहे. त्यामुळे घाबरलेल्या भाजपने गांधी यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी अशी कृत्ये करणे सुरू केले आहे.

भाजपने अनेक आश्वासने दिली; पण त्यांची पूर्ती केली नाही, हे जनता जाणून आहे. जनतेचे लक्ष मूळ मुद्यांपासून विचलित करण्यासाठी भाजपने असल्या खेळ्या खेळणे सुरू केले आहे.

- अमित पाटकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

या देशासाठी गांधी घराण्यातील अनेकांनी हौतात्म्य पत्करले आहे. भाजप केवळ अशी टीका करून फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. लोकसभा निवडणूक जवळ येत चालली आहे तसा भाजप बिथरू लागला आहे. त्यांना निवडणुकीतील पराभव आतापासूनच दिसू लागला असल्याचे निदर्शक हे कृत्य आहे.

- युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT