Goa Congress Protest Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: सेबी प्रमुखांनी राजीनामा द्यावा! 'अदानी’ चौकशीसाठी ‘जेपीसी’ची मागणी

Goa Congress Protest: ‘ईडी’ कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: काँग्रेस देशभरात अदानी समुहाचा घोटाळा पुढे आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सेबीच्या प्रमुख माधबी बुच यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, तसेच अदानी प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्याची मागणी करत काँग्रेसच्यावतीने गुरुवारी करण्यात आली.

‘ईडी’ कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्ता, महिला प्रदेशच्या अध्यक्षा बिना नाईक यांच्यासह इतर मान्यवरांचा सहभाग होता.

काँग्रेसच्यावतीने पणजीसह देशभर ‘ईडी’च्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येत आहेत. हिंडनबर्गने बाहेर आणलेल्या घोटाळ्याचा संदर्भ देत आलेमाव म्हणाले, भाजप सरकारने अदानी ग्रुप जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत गेला आहे. हिंडनबर्ग संशोधन संस्थेने सेबीचा घोटाळा बाहेर काढला आहे. २०१८-१९ मध्ये अदानी समूहाला मोठ्याप्रमाणात सवलत दिली आहे, त्यातून कर चुकवून गोळा केलेला पैसा परदेशात गेला आहे. सेबी ही संस्था स्वायत्त रहायला हवी.

बुच यांच्याकडे कोट्यवधी रुपये आले कुठून ?

‘सेबीच्या अध्यक्ष बुच यांनी अद्याप राजीनामा का दिला नाही? जर गुंतवणूकदारांनी कष्टाने कमावलेला पैसा गमावला तर कोणाला जबाबदार धरले जाईल-पीएम मोदी, बुच की गौतम अदानी? बुच यांच्याकडे कोट्यवधी रुपये कुठून आले, असा प्रश्‍न त्यांनी केला. २०१२ मध्ये पर्रीकर यांनी ३५ हजार कोटींचा खाण घोटाळा झाल्याचे सांगितले, हे पैसे कुठे गेले असेही पाटकर यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT