Amit Patkar  Dainik Gomantak
गोवा

Amit Patkar : कुडचडेची वाटचाल बिहारच्या दिशेने

गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांची नीलेश काब्राल यांच्यावर थेट टीका

आदित्य जोशी

Amit Patkar : कुडचडेची वाटचाल बिहारच्या दिशेने होत असल्याची घणाघाती टीका गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे. मंत्री नीलेश काब्राल यांच्यावर पाटकरांनी शरसंधान साधलं आहे. पर्यावरण मंत्री नीलेश काब्राल यांच्याच मतदारसंघात बेकायदा वाळू उत्खननातून गोळीबार होण्याची घटना चिंतेची बाब असल्याचं पाटकरांनी म्हटलं आहे.

माड बाणसाय कुडचडे येथे एका कामगारांचा गोळी झाडून खून करण्यात आला आहे, तर गोळीबारात एक गंभीर जखमी झाला आहे. बेकायदेशीर रेती व्यवसायातून खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कुडचडे परिसरात माफिया वॉर सुरु असल्याची चर्चाही आता सुरु झाली आहे.

बुधवारी रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली आहे. पोलीस घटनास्थळी हजर झाले असून त्यांनी पंचनामा केला आहे. या गोळीबारात ज्या कामगाराचा मृत्यू झाला आहे त्याचं नाव युसुफ आलम (23) असून तो मूळचा झारखंडचा रहिवासी असल्याची माहिती आहे. तर या गोळीबारात जखमी झालेल्या कामगाराचं नाव महमद साहू (33) असं आहे. तीन कामगार होडी घेऊन रेती काढण्यास जात असताना अज्ञाताने गोळीबार केल्याची माहिती आहे.

बाणसाय कुडचडे येथे बेकायदेशीर रेती व्यवसायातून एका कामगाराचा गोळी झाडून खून केल्याची खळबळजनक घटना घडली असून यात एक कामगार गंभीर जखमी झाला. त्याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू असून एक कामगार या हल्ल्यातून सुदैवाने बचावला आहे.

सदर घटना काल मध्यरात्री सुमारे दीड वाजता घडली असल्याचे पोलीस अधिक्षक सेमी तावारीस यांनी सांगितले. रेती आणण्यासाठी होडी घेऊन जात असताना अज्ञात व्यक्तीने या कामगारांवर गोळी झाडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nepal Flood: पीडितांचे हात सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला; आसाम, नेपाळसाठी 3 टन मदतसामग्री गोव्‍यातून रवाना

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

SCROLL FOR NEXT