South Goa congress  Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: ‘सनबर्न’ला काँग्रेसचा कडाडून विरोध

Sunburn Festival: ‘आयडीसी’च्या जागेत हा महोत्सव आयोजण्याचा घाट असल्याचे माहीत असूनही आलेक्स रेजिनाल्ड गप्प का असा सावियो यांनी सवालही केला

गोमन्तक डिजिटल टीम

सनबर्न महोत्सव उत्तर गोव्यातून दक्षिण गोव्यात आयोजित करण्यास कॉंग्रेस पूर्ण ताकदीनिशी विरोध करणार असल्याचे सांगून दक्षिण गोवा कॉंग्रेस अध्यक्ष सावियो डिसिल्वा यांनी आज मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘सनबर्न’ संदर्भातील कॉंग्रेसची भूमिका स्पष्ट केली. ‘आयडीसी’च्या जागेत हा महोत्सव आयोजण्याचा घाट असल्याचे माहीत असूनही आलेक्स रेजिनाल्ड गप्प का,असा सवालही त्यांनी केला.

गोव्यात सनबर्न महोत्सवाचे आयोजन करण्यासच कॉंग्रेसचा विरोध आहे, असे त्यांनी सांगितले.सनबर्न महोत्सव म्हणजे ड्रग्ज, वेश्याव्यवसाय व मृत्यूचा सापळा आहे. अशा परिस्थितीत आम्हाला दक्षिण गोव्यातील शांतता भंग करू द्यायची नाही, असे सावियो डिसिल्वा यांनी सांगितले.

काही एजंट दक्षिणेतील प्रमुख वकिलांना भेटून त्यांना ‘सनबर्न’च्या समर्थनार्थ जनहित याचिका दाखल करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. असा आरोप डिसिल्वा यांनी केला.

‘आयडीसी’चे चेअरमन व कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यानी ‘सनबर्न’बाबत भूमिका स्पष्ट करावी. एकेकाळी बोलके असलेले हे आमदार मौन का बाळगत आहेत, अशी शंका प्रदेश सरचिटणीस मोरेनो रिबेलो यांनी व्यक्त केली.

विरोधीपक्ष नेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्टा, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी आधीच ‘सनबर्न’ला विरोध दर्शविल्याचेही डिसिल्वा यांनी सांगितले. दरम्यान,२० रोजी सकाळी ११ वा. जिल्हाधिकारी संकूल परिसरात ‘सनबर्न’चा निषेध करण्यासाठी लोकांनी एकत्र यावे,असे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT