Goa
Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics:...यासाठी काँग्रेसचा मुख्यमंत्री सावंतांना एका आठवड्याचा अल्टिमेटम

दैनिक गोमन्तक

Goa Politics: डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भ्रष्टाचारी सरकारविरोधात काँग्रेसचा लढा कायम राहील. जर काँग्रेसला लोकांनी विधानसभेत स्पष्ट बहुमत दिले असते, तर आम्ही पारदर्शक कारभार करणारे सरकार राज्याला दिले असते, असे मत काँग्रेसचे गोवा प्रभारी मणिकम टागोर यांनी व्यक्त केले.

काँग्रेस भवनात शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, खासदार फ्रान्सिस सार्दिन, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्‍टा, आमदार कार्लुस फेरेरा उपस्थित होते.

टागोर म्हणाले की, गोव्यातील काँग्रेसची पुनर्बांधणी केली जाणार आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत गोव्यातील दोन्ही जागा जिंकण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. काँग्रेसचे ‘हात से हात जोडो’ अभियान राज्यभर सुरू आहे. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ आंदोलनामुळे अनेक लोक पक्षाशी जोडले गेले.

पणजी, मडगावात उद्या आंदोलन

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पाटकर म्हणाले, मोदी सरकारने 2014 च्या निवडणुकीत दहा हजार कोटी रुपये देशभर फिरण्यासाठी मोडले. अदानींना वाचविण्यासाठी देशातील विमाधारकांचे एलआयसी व स्टेट बँकेतील पैसे भाजप सरकार वापरत आहे.

याविरोधात सोमवारी सकाळी 10 वाजता पणजीतील एलआयसी कार्यालयासमोर तर मडगावातील एसबीआय बँकेसमोर आंदोलन छेडण्यात येईल.

शहांच्या वक्तव्याचे खंडन का नाही?

युरी आलेमाव म्हणाले, मुख्यमंत्री सावंत यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचे खंडन करायला हवे होते. जर हा विषय हाताळता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा.

पणजीच्या आमदारांना न घेताच सरकारचे शिष्टमंडळ स्मार्ट सिटीचा अभ्यास करण्यासाठी इंदौरला जात आहे, हा काय प्रकार आहे? आम्ही म्हादईविषयी कर्नाटकशी कधीच समझोता करणार नाही. लोकसभेतही म्हादईचा प्रश्‍न मांडणार आहोत, असे खासदार सार्दिन यांनी सांगितले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना दिला अल्टिमेटम

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हादई नदीचे पाणी वळविण्याच्या मुद्यावर केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी गोवा काँग्रेसने काल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना एका आठवड्याचा अल्टिमेटम दिला आहे.

गोव्यातील काँग्रेस पक्षाच्या भविष्यातील राजकीय वाटचालीविषयी चर्चा करण्यासाठी गोवा काँग्रेसच्या राजकीय व्यवहार समितीची आज बैठक झाली. काँग्रेसचे गोवा डेस्क प्रभारी मणिकम टागोर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीत घेतलेल्या ठरावात ही भूमिका मांडण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT