Vijai Sardesai, Amit Sawant  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: सरदेसाई यांनी ‘आम्हांला संशय आहे,‘ असे वक्तव्य केले, त्यामुळे आपले मन दुखावले; ॲड. अमित सावंतांचा गौप्यस्फोट

Amit Sawant: दीपक कळंगुटकर यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसच्या मांद्रे गटातील नेत्यांवर टीका केली. त्यांनी प्रदीप देसाई यांनी केलेल्या विधानांचा त्यांनी समाचार घेतला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: मांद्रेचे माजी सरपंच ॲड. अमित सावंत यांच्या काँग्रेस पक्षावरून सुरू झालेल्या वाद काही संपण्याची चिन्हे दिसत नाहीत.

रविवारी गोवा फॉरवर्डचे उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष दीपक कळंगुटकर यांनी काँग्रेसच्या मांद्रे गटातील नेत्यांवर टीका केली आहे. तर दुसरीकडे सावंत यांनी गोवा फॉरवर्डचे नेते तथा आमदार विजय सरदेसाई यांनाच आता जिल्हाध्यक्ष कळंगुटकर यांच्याविषयी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. यावरून सध्या काँग्रेस-फॉरवर्ड आणि सावंत असा त्रिकोणी वाद चर्चेचा विषय बनू लागला आहे.

दीपक कळंगुटकर यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसच्या मांद्रे गटातील नेत्यांवर टीका केली. त्यांनी प्रदीप देसाई यांनी केलेल्या विधानांचा त्यांनी समाचार घेतला. त्याशिवाय देवेंद्र प्रभुदेसाई यांच्याही राजकीय कारकिर्दीवर कळंगुटकर यांनी भाष्य केले. अमित सावंत याचा गोवा फॉरवर्डमध्ये कसा प्रवेश झाला, याचीही माहिती त्यांनी दिली.

त्याशिवाय त्याचा भूखंड घोटाळ्याशी आलेल्या संबंधामुळे त्याला पक्षातून काढण्यात आल्याच्या घटनेवर त्यांनी प्रकाश टाकला. त्याशिवाय आपण अजूनही एकाच पक्षात आहोत, असेही त्यांनी टीकाकारांना उत्तर दिले. अमित सावंत यांचा सायंकाळी व्हिडिओ व्हायरल झाला. त्यांनी त्यात सांगितले की, गोवा फॉरवर्डचे आमदार सरदेसाई यांनी ‘आम्हांला संशय आहे,‘ असे आपल्याविषयी वक्तव्य केले. त्यामुळे आपले मन दुखावले.

विधानसभेत ते ज्यापद्धतीने बाजू मांडतात, ते निश्चित भावणारे आहे. आपल्याला त्यांच्याविषयी असलेला आदर तसाच राहील. मात्र, त्यांनी उत्तर गोव्याचे जिल्हाध्यक्ष कळंगुटकर यांच्याविषयी आत्मनिरीक्षण करावे, असे आपले आवाहन आहे. हे आत्मपरीक्षण कशासाठी की, २०१५ मध्ये जिल्हा पंचायत निवडणूक पक्षीय पातळीवर झाली. त्यावेळी कळंगुटकर हे भाजपचे धारगळमधून जिल्हा पंचायतीचे उमेदवार होते.

दहा वेळा विचार करा!

अमित सावंत म्हणाले, २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीतही गोवा फॉरवर्डचे तीन आमदार निवडून आले. २०१६ मध्ये एका हॉटेलमध्ये सरदेसाईंची बैठक झाली, आपण तेथे उपस्थित होते. तेव्हा काँग्रेसमध्ये होतो, पण आम्हांला फॉरवर्डमध्ये या म्हणून आमंत्रण दिले, पण आम्ही प्रवेश केला नाही. स्वतःचे पद टिकवण्यासाठी खोटी माहिती पुरवतात, त्यांच्याविषयी सरदेसाई यांनी आत्मपरीक्षण करावे. कोणावर कारवाई करताना दहावेळा विचार केला जावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT