Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: मडगाव पालिकेचे माजी नगराध्यक्ष सॅव्हियो कुतिन्हो यांचा समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला मिळाले बळ

Akshay Nirmale

Goa Congress: मडगाव पालिकेचे माजी नगराध्यक्ष सॅव्हियो कुतिन्हो यांनी त्यांच्या समर्थकांसह आज, मंगळवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुढील वर्षात लोकसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कुतिन्हो यांच्या प्रवेशाने काँग्रेसला ताकद मिळाली आहे.

यावेळी दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस्को सार्दिन, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार कार्लुस फेरेरा, आमदार आल्टन डिकॉस्टा, दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सॅव्हिडो डिसिल्वा, एम. के. शेख आदी उपस्थित होते.

यावेळी खासदार सार्दिन म्हणाले की, आज अनेक युवक बेरोजगार आहे. त्यांना नोकरी देण्याची गरज आहे. महागाई वाढली आहे. भाजपविरोधात सर्वसामान्यांमध्ये रोष आहे.

दरम्यान, काँग्रेस पक्षाची सेवा करण्याबाबतची बांधिलकी कुतिन्हो त्यांनी व्यक्त केली. गोव्याच्या स्वातंत्र्यानंतर गोव्याच्या भविष्याचा, कोकणी भाषेचा प्रश्न निर्माण झाला. हे दोन्ही प्रश्न काँग्रेस पक्षाने सोडवले. कोकणीला साहित्य अकादमीची मान्यता मिळवून दिली.

राजीव गांधींमुळे कोकणीला राज्यभाषेचा दर्जा मिळाला. गोव्यासाठी आणि गोंयकारपण जोपासण्यासाठी काँग्रेसने नेहमीच प्रयत्न केले, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT