Goa Congress complaint Against BJP 
गोवा

Goa Congress complaint Against BJP: आचारसंहितेचा भंग; भाजपविरोधात गोवा काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

काँग्रेसने भारतीय जनता पक्ष, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उत्तर गोवा खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Pramod Yadav

Goa Congress complaint Against BJP

'विकसित भारत' च्या नावाखाली भाजप लोकसभा निवडणूक प्रचार करून आचारसंहितेचा भंग करीत असल्याची तक्रार गोवा काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केलीय.

काँग्रेसने भारतीय जनता पक्ष, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उत्तर गोवा खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. बुधवारी (दि.20) याबाबत तक्रार निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार करण्यात आलीय.

उत्तर गोव्यातील उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी विकसित भारत कार्यक्रमाचा आणि राज्य यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा आरोप याद्वारे करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने 16 मार्च रोजी देशातील लोकसभा निवडणुकीची घोषणा केली, दुपारी तीन नंतर देशात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उत्तर गोवा खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी हणजूणे येथे प्रचारसभा घेऊन आदर्श आचारसंहिताचा भंग केल्याचा आरोप काँग्रेसने तक्रारीतून केला आहे.

एकदा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर, भाजप सरकार विकसित भारत मोहिमेसारखे कोणतेही प्रचारात्मक कार्यक्रम आयोजीत करु शकत नाही. भाजपचे स्कार्फ व टोप्या यांचा वापर सरकारी कार्यक्रमात होवू शकत नाही.

निवडणुक आयोगाने यावर त्वरित बंदी न घातल्यास आम्ही न्यायालयात दाद मागू असा इशारा कार्लोस फरेरा यांनी दिला.

2015 मध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर पक्षांतराला प्रोत्साहन देऊन भाजपने केलेल्या लोकशाहीच्या हत्येविरुद्ध कॉंग्रेस लढत आहे. भारत जोडो यात्रा ही भारतातील प्रेम आणि एकता पसरवण्यासाठी होती आणि भारत जोडो न्याय यात्रा ही युवक, महिला, शेतकरी, उपेक्षित क्षेत्र आणि ओबीसी, एससी आणि एसटी यांना सक्षम करण्यासाठी आहे, असे अमित पाटकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT