Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा

Goa Congress Defection : ‘क्या हुआ तेरा वादा’ ते ‘देवाक काळजी’

घाऊक पक्षांतरावरून सोशल मीडियावर जबरदस्त टीका-टिप्पणी

दैनिक गोमन्तक

पणजी : काँग्रेसच्या आठ आमदारांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सोशल मीडियावर जनतेच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्या आमदारांनी देवापुढे घेतलेल्या शपथेची आठवणही करून दिली आहे. पक्ष प्रवेशानंतर अवघ्या काही मिनिटांतच ते आमदार कॉंग्रेस पक्षासाठी शपथ घेत असल्याचे जुन्हे व्हिडियो आणि मिम्स् व्हायरल झाले. ‘क्या हुआ तेरा वादा...’ ते ‘देवाक काळजी’ अशा खुमासदार प्रतिक्रियांनी नेटकऱ्यांनी मनातील भावना व्यक्त केल्या.

बुधवारी सकाळी जेव्‍हा पक्षांतर होणार असल्याची चर्चा सुरू झाली, तेव्हापासून दिगंबर कामत यांनी निवडणुकीपूर्वी काँग्रेस उमेदवारांना पणजीतील महालक्ष्मी मंदिर, बांबोळीतील फुलांचाे खुरिस आणि बेती येथील दर्ग्यामध्ये जाऊन पक्षांंतर करणार नसल्याची शपथ घेत असल्याचा व्हिडियो व्हायरल झाला. पक्षांतर झाल्यानंतर कामत यांनी आपण देवाला विचारूनच हा निर्णय घेतल्याचे विधान केल्यानंतर ते राज्यातच नव्हे, तर देशभरात प्रसिद्ध झाले. अवघ्या काही तासांतच त्यांच्यावर व्हिडियो आणि मिम्स बनवण्यात आले.

व्हायरल झालेल्या व्हिडिओतून जनतेने सडकून टीका केली. देवा तू अवतारित होऊन पुन्हा पृथ्वीवर येऊन या आमदारांना धडा शिकव. वचन दिले तू मला..., कलीयुग आहे घोर कलीयुग, देवालादेखील आज सोडले नाही, अशा तिखट प्रतिक्रिया वाचायला मिळाल्या, तर काहींनी व्हिडिओ शेअर करत आमदारांची खिल्ली उडवली. खासकरून कामत हे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर होते.

तेव्हा सडकून टीका, पण आता स्तुतिसुमने

निवडणुकीपूर्वी दिगंबर कामत हे राज्यातील चणेकार, खाजेकार, गाडेकार, पायलट यांच्यावर अन्याय होत असल्याची टीका करत होतो. आता ते भाजप सरकार आणि पंतप्रधान मोदी यांचे कौतुक करत असून ही मंडळी आता सुखात दिवस काढणार, असे टोमणेही हाणले गेले.

भीती नसल्यानेच त्यांचे धाडस : जनतेचा विश्‍वासघात करून त्यांचे मन भरले नाही, त्यामुळे त्यांनी देवाचा विश्‍वासघात केला आहे. देवापुढे कोणाचे काही चालत नाही; परंतु या आमदारांना कोणाचीही भीती नसल्याचे दिसते. तसेच हिंदू देवांच्या व्हिडिओला कोकणी संवाद जोडून देव या आमदारांना फटकारत असल्याचेही दर्शविले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT