Goa Municipality | Ponda Municipality Dainik Gomantak
गोवा

Goa Municipality: काँग्रेसची फोंडा पालिका करवाढीवर टीका!

Goa Municipality: काँग्रेसने फोंडा पालिकेने वाढवलेल्या निवासी आणि व्यावसायिक करावरुन ही टीका केली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Municipality: फोंडा पालिकेने वाढवलेल्या निवासी व व्यावसायिक करावरून फोंड्यातील काँग्रेस पक्षाने फोंडा पालिकेवर टीका केली आहे. फोंड्यात काल शनिवारी झालेल्या या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे फोंड्यातील नेते राजेश वेरेकर, फोंडा पालिकेचे काँग्रेस समर्थक नगरसेवक विलियम आगियार, माजी सरपंच जॉन परेरा तसेच सर्फराज ख्वाजा आदी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

राजेश वेरेकर म्हणाले, फोंडा पालिकेने केलेली व्यावसायिक करवाढ अन्याय्यकारक आहे. टप्प्याटप्प्याने ही करवाढ केली असती तर चालले असते, पण एकदम करवाढ करून सर्वसामान्यांवर हा कराचा बोजा टाकण्यात आला आहे.

नगरसेवक विलियम आगियार म्हणाले, करवाढ केल्याने आपण त्याला विरोध केला. गोवा फॉरवॉर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनीही फोंडा पालिकेची करवाढ अन्याय्यकारक असून ती त्वरित रद्द करावी, अशी मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: गोव्याच्या 'निधी'चा 'यूपी'त वापर; खासदार सदानंद शेट तानावडेंवर काँग्रेसकडून टीका

FIFA World Cup 2026: स्वित्झर्लंड चितपट! 3-1 ने विजय मिळवत अर्जेंटिनाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री, इंग्लंडविरुद्ध होणार हाय-व्होल्टेज सामना

Goa Drug Case: पणजीत 'अंमली पदार्थ तस्करी'चा पर्दाफाश! 15 लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक, मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू

मंत्री माविन, बाबूश यांना दिलासा, 'त्‍या' बहुचर्चित प्रकरणांना आव्‍हान न देण्‍याचा पोलिसांचा निर्णय

Goa Cyber Crime: दररोज 15 गोमंतकीय सायबर जाळ्यात! गुन्हेगारीचा वाढतोय फास; राज्यात सहा महिन्यांत 2,637 जणांना गंडा

SCROLL FOR NEXT