Goa Congress Dainik Gomantak
गोवा

संसद भवनासाठी माती पाठवणे, हा भावनांशी खेळण्याचा डाव

काँग्रेसचा आरोप: ‘राम शिला’च्या विटांचे स्पष्टीकरण द्यावे

दैनिक गोमन्तक

पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार नवीन संसद भवनासाठी माती संकलन या देशव्यापी कार्यक्रमाद्वारे भोळ्याभाबड्या जनतेच्या भावनांशी खेळत आहे. गोळा केलेली माती शेवटी कुठेतरी फेकली जाईल किंवा भाजपसाठी निधी तयार करण्यासाठी विकली जाईल, असा आरोप काँग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी ट्विटद्वारे केला आहे.

(Goa Congress accuses BJP)

अयोध्येतील प्रस्तावित श्रीराम मंदिरासाठी भाजप तसेच त्यांच्याशी सलग्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषद यांनी गोळा केलेल्या विटांची मला गोव्यातील लोकांना आठवण करून द्यायची आहे. त्या विटा आता कुठे आहेत असा प्रश्‍न उपस्थित करून पणजीकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना ‘राम शिला’ म्हणून जमा केलेल्या विटासंदर्भात स्पष्टीकरण देण्याची मागणी केली.

त्या विटा तथा राम शिला भाजप कार्यकर्ते व स्वयंसेवकांकडे देण्यापूर्वी राज्यभरातील लोकांनी आपल्या देवघरांत ‘राम शिलां’ची पूजा केली होती. आज अयोध्येतील श्रीराम मंदिराचे बांधकाम मार्बल आणि ग्रेनाइट्सने केले जाते. त्या विटांच्या विक्रीतून भाजपच्या संघटनांनी पैसा कमावल्याचा आरोप झाला होता आणि त्यावर आजपर्यंत भाजपतर्फे कोणीही स्पष्टीकरण दिलेले नाही, असे पणजीकर यांनी सांगितले.

‘माती गोळा करण्याचा भाजपला अधिकार नाही’

सरकारकडून या राज्याच्या सुपीक मातीचे कोळसा धुळीत रूपांतर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रस्तावित नवीन संसद भवनासाठी माती गोळा करण्याचा भाजपला नैतिक अधिकार नाही. करोडो रुपये खर्चाचे नवीन संसद भवन मातीने बांधले जाणार की सिमेंट आणि काँक्रीटने, असा खोचक प्रश्‍न अमरनाथ पणजीकर यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT