Ashok Patki & Avadhut Gupte Dainik Gomantak
गोवा

Goa: 'गीत जन्मताना' कार्यशाळेला संगीतकार अशोक पत्की आणि अवधूत गुप्तेंची हजेरी

या कार्यशाळेत प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की (Ashok Patki) तसेच अवधुत गुप्ते (Avadhut Gupte) सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: सम्राट क्लब, मडगावतर्फे पलाश अग्नी स्टुडियोस आणि अंतर्नाद क्रिएशन्स  या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने गीत जन्मताना (गीत लेखन ते गायन) या गीत लेखन ते गायन पर्यंतच्या प्रवासाची ओळख घडवणाऱ्या पांच दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेला उद्यापासुन 20 जुलै 2021) सुरुवात होत आहे.  या कार्यशाळेत  प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की (Ashok Patki) तसेच अवधुत गुप्ते (Avadhut Gupte)  सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत. शिवाय  गोव्याचे संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध आणि अनुभवी कलाकारही सहभागी होणार आहेत. या कार्यशाळेचा समारोप 24 जुलै रोजी होणार आहे. पालश अग्नी स्टुडियोसच्या फेसबूक पेजवर या कार्यशाळेचे दर दिवशी संध्याकाळी 6 थेट प्रक्षेपण करण्यात येईल.

या कार्यशाळेत गीत लेखन या विषयावर साईश पाणंदिकर आणि डॉ. राजय पवार, संगीत ह्या विषयावर यतीन तळावलीकार आणि दिलीप वझे, संगीत- वाद्य संयोजन ह्या विषयावर विष्णू शिरोडकार आणि सिंधुराज कामत तर गायन ह्या विषयावर डॉ. प्रवीण गांवकार (Dr. Praveen Gaonkar) आणि अक्षदा तळावलीकार हे कलाकार मार्गदर्शन करणार आहेत. ह्या कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात गीत लेखन ते गायन पर्यंतच्या प्रवासावर हे मार्गदर्शक एकत्र येऊन गट चर्चा करतील. त्यात पत्की व गुप्ते सहभागी होणार आहेत. या संपुर्ण कार्यशाळेचे  सुत्रसंचालन प्रसिद्ध सुत्रनिवेदक गोवींद भगत  करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT