Goa Company Fire: Dainik Gomantak
गोवा

Goa Company Fire: होंडा येथे फार्मा कंपनीचे गोदाम भीषण आगीत खाक; 6 तासानंतर आगीवर नियंत्रण

लाखो रूपयांचे नुकसान; 8 अग्निशमन बंब घटनास्थळी

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Pharma Company Fire: गोव्यातील होंडा येथील औद्योगिक वसातहतीत फार्मा कंपनीच्या एका गोदामाला बुधवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत कंपनीचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

ही आग इतकी भीषण होती की आग विझविण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाचे 8 बंब दाखल झाले होते. तरीही ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला सहा तास लागले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पुनिस्का इंजेक्टेबल प्रा. लि. या फार्मा कंपनीचे हे गोदाम आहे. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याचे समजते. त्यानंतर अग्निशमन दलाला ही माहिती देण्यात आली. वाळपई, डिचोली येथील अग्निशमन दलाचे 8 बंब घटनास्थळी दाखल झाले होते.

अग्निशमन दलाने सहा तास प्रयत्न करून सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळवले. ही कंपनी सलाईन आणि इतर वैद्यकीय साहित्य तयार करते. जेसीबी वापरून गोदामातील रसायनांची खोकी बाहेर काढली गेली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT