Goa Colva Resort theft case Dainik Gomantak
गोवा

कामगाराने रिसॉर्टमधून चोरी केली 8 लाखांची रोकड, मोपावरून विमानाने गाठली दिल्ली पण डाव फसला

पोलिसांना त्‍याला पकडल्‍यानंतर त्‍याच्‍याकडे साडेसात लाख रुपयांची रोख सापडली. आज त्‍याला गोव्‍यात आणण्‍यात आले.

Pramod Yadav

Goa Colva Resort theft case: कोलवा येथील एका रिसॉर्टमधून आठ लाखांची रोकड घेऊन पळ काढलेल्‍या संशयिताला अवघ्‍या काही तासांतच दिल्‍ली विमानतळावर जेरबंद करण्‍यात आले. दिग्‍विजय सिंग (वय 22) असे संशयिताचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील लखनौ येथील असल्याची माहिती कोलवा पोलीसांनी दिली.

पोलिसांना त्‍याला पकडल्‍यानंतर त्‍याच्‍याकडे साडेसात लाख रुपयांची रोख सापडली. आज त्‍याला गोव्‍यात आणण्‍यात आले.

संशयिताला ताब्‍यात घेण्‍यासाठी कोलवा पोलीस ठाण्‍याचे एक पथक दिल्‍लीला रवाना झाले हाेते. या प्रकरणात जाॅन डिसौझा हे तक्रारदार आहेत. संशयित प्रशिक्षणार्थी म्‍हणून कोलवा येथील कृष्‍णा बीच रिसोर्ट येथे कामाला होता.

पहाटे त्‍यांनी आपल्‍या मालकाला भाऊ आजारी असल्‍याने आपल्‍याला तातडीने घरी जायचे आहे पगार द्यावा, असे सांगितले होते. काही वेळ थांब पगार देतो, असे त्‍याला सांगण्‍यात आले होते. त्‍यानंतर डिसौझा हे रिसोर्टवर आले असता, त्‍यांना दिग्‍विजय तिथे दिसला नाही. मात्र आठ लाख रोख व देवाच्‍या दोन मूर्ती चोरीला गेल्‍याचे दिसून आले.

चोरीपूर्वी त्‍यांनी सीसीटीव्‍ही केबल तोडली होती. मात्र कॅमेर्‍यासमोर तो पहाटेच्‍या सुमारास उभा असल्‍याचे दिसून आले आहे. पोेलिसांनी तक्रार नोंद होताच तपासाला प्रारंभ केला. त्‍यात संशयित भाड्याच्‍या एका टॅक्‍सीने गेला होता असे कळाले.

नंतर त्‍या टॅक्‍सी चालकांकडून पोलिसांनी माहिती गोळा केली असता, संशयित प्रथम दाबोळी विमानतळावर गेला होता. मात्र दिल्‍लीला जाणारे विमान चुकल्‍यानंतर त्‍याने त्‍या टॅक्‍सी चालकाला कळंगुट येथे एका हॉटेलवर नेऊन सोडण्‍यास सांगितले होेते.

पोलिसांनी लागलीच त्‍या हॉटेलमध्‍ये जाऊन नंतर चौकशी केली असता, तो तेथून मोपा विमानतळावर गेल्‍याचे समजले. नंतर पोलिसांनी विमानतळ पोलिसांशी संपर्क साधला असता, संबंधित वर्णनाची एक व्‍यक्‍ती दिल्‍लीला रवाना झाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. वरिष्‍ठ पोलिसांना याबाबत माहिती दिल्‍यानंतर दिल्‍ली पोलिसांना सतर्क करण्‍यात आले. संशयित दिल्‍ली विमानतळावर पोहोचताच तिथे दबा धरुन बसलेल्‍या पोलिसांनी त्‍याला जेरबंद केले.

संशयिताविरोधात कोलवा पोलिसांनी भादंसंच्‍या 381 कलमाखाली गुन्‍हा नोंद केला आहे. या प्रकरणी सध्‍या कोलवा पोलीस स्‍थानकाचा ताबा सांभाळणारे कुंकळ्‍ळीचे पोलीस निरीक्षक तुकाराम चव्‍हाण यांच्‍या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुभाष गावकर पुढील तपास करीत आहेत.

या संशयिताला पकडण्‍यात पोलीस निरीक्षक तुकाराम चव्‍हाण, उपनिरीक्षक सुभाष गावकर, महिला सहाय्‍यक उपनिरीक्षक एलिझा फर्नांडिस, हवालदार रोहन नाईक व पोलीस शिपाई मोहीत गोसावी यांनी मोलाची कामगिरी निभावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT