Girish Chodankar Dainik Gomantak
गोवा

Colva Beach: कोलवा समुद्रकिनारी 'पे पार्किंग' वरून स्थानिकांची लूट: गिरीश चोडणकरांचा आरोप

Colva Beach: गोवा हे भाजप पक्षाचे एटीएम मशीन असून इतर पक्षांचे आमदार खरेदी करण्यासाठी ते गोव्‍यातील पैशांचा वापर करतात

गोमन्तक डिजिटल टीम

Colva Beach: कोलवा सारख्‍या प्रसिद्ध समुद्र किनार्‍यावर पे पार्किंग सुरु करुन गोवा सरकार गोव्‍यातील सामान्‍य लोकांची लुटमार करु पहातो असा आराेप काँग्रेस नेते गिरीश चाेडणकर यांनी केलाय.

गोव्‍याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारकडे महसूल मिळवून देण्याची कोणतीही योजना किंवा दूरदृष्टी नाही, कुठल्‍याही प्रकारची दूरदृष्‍टी नसल्‍यामुळेच सरकार पे पार्किंगच्‍या माध्‍यमातून महसूल गोळा करु पहात असल्‍याचा आरोप चाेडणकरांनी केलाय.

ते म्हणाले की, भाजप सरकार आपली लोकविरोधी धोरणे लादून स्थानिकांचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा आवाज दाबण्यात गुंतले आहे.

“फक्त कोलव्यातील लोकांनीच नाही, तर स्थानिक पंचायतीनेही कोलवा समुद्र किनारा परिसरात पार्किंगसाठी शुल्क आकारण्याच्या सरकारच्या योजनेवर आक्षेप घेतला आहे.

ग्रामसभेत कोलवा बीचवरील प्रस्तावित पे पार्किंगला कोलवा ग्रामस्थांचा एकमुखी विरोध दिसून आला आहे. कोणतीही गोष्ट एकतर्फी लादण्याआधी सरकारने संवादाला सुरुवात करावी अशी मागणी त्‍यांनी केली.

“हे सरकार दोन गोष्टींसाठी ओळखले जाते, एक म्हणजे इव्‍हेंट आयोजन आणि दुसरे म्हणजे एकूण कमिशनसाठी. गोवा हे भाजप पक्षाचे एटीएम मशीन बनले आहे. इतर पक्षांचे आमदार खरेदी करण्यासाठी आणि सरकार पाडण्यासाठी ते गोव्‍यातील पैशांचा वापर करतात.

आता लोकसभा निवडणूक जवळ आल्याने ते ‘एम’ व्‍हिटामीन मिळविण्यासाठी असे उपाय घेतले जात आहेत.’’ असा आरोप चोडणकर यांनी केला.

केंद्रात पैसे पाठवण्यासाठी भाजपला लोकसभा निवडणुकीपूर्वी एटीएम पुन्हा भरायचे आहेत का? असा सवाल करुन कोलवा समुद्रकिनारी पे पार्किंग सुरु करुन त्‍यांना भ्रष्‍टाचार करायचा आहे असा आराेप केला. या प्रस्‍तावाला आमचा पूर्ण विरोध असेल असे ते म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT