Goa College of Arts building Leakage  Dainik Gomantak
गोवा

Goa College of Art : कला महाविद्यालयाचे बिघडले ‘आर्ट’; गळतीमुळे चक्क पाण्यात वर्ग

पंखे, लाईटही नादुरूस्त

दैनिक गोमन्तक

Goa College of Arts building Leakage : राज्यातील एकमेव कला महाविद्यालयाचे ‘आर्ट’ बिघडले असून संपूर्ण इमारतीला घरघर लागली आहे. भिंतींना तडे गेले असून छताला गळती लागल्याने विद्यार्थ्यांना अक्षरशः पावसाच्या पाण्यात कलेचे धडे गिरवावे लागत आहेत. यापुढे अशा स्थितीत आपण शिकावे कसे,असा प्रश्‍न करून विद्यार्थ्यांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे.

राज्यातील चित्र, शिल्प तसेच इतर विविध कलांची आवड असणारे विद्यार्थी आल्तिनो येथील कला महाविद्यालयात प्रशिक्षण घेतात. गोमंतकीय कलाकारांसाठी या महाविद्यालयाची इमारत म्हणजे कलेचे मंदिर आहे.

परंतु ही इमारत जीर्णावस्थेत असून छताचे प्लास्टर गळत असल्याने ही इमारत धोकादायक आहे. या वास्तूचे नूतनीकरण करावे किंवा नवी वास्तू उभारावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. या इमारतीच्या भिंतीदेखील जीर्ण झाल्याने सततची मनात भीती असते. त्यामुळे शासनाने योग्य ते सोपस्कार पूर्ण करत इमारतीची डागडुजी करावी, असे विद्यार्थ्यांचे मत आहे.

शौचालयांची दुरवस्था

महाविद्यालयातील शौचलयांची देखील दुरवस्था झाली असून त्यांच्या डागडुजीची गरज आहे. महाविद्यालयात अनेक समस्या भेडसावत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

"मी या महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाचा कारभार काही महिन्यांपूर्वीच स्वीकारला आहे. तरी देखील गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाची महाविद्यालयाची स्थिती चांगली आहे कारण महाविद्यालयाची काहीप्रमाणात डागडुजी करण्यात आली आहे. येत्या काळात महाविद्यालयाच्या विविध समस्या कशा सोडविता येतील यावर तोडगा काढणार आहे."

- विल्फिड गोईश, प्राचार्य, कला महाविद्यालय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT