Goa Students |ABVP Protest Dainik Gomantak
गोवा

ABVP Protest: प्रश्‍‍नांच्‍या भडिमारासमोर 'अभाविप' निरुत्तर

परवानगी घेतली होती का ? मध्‍यरात्री पोस्‍टर्स का लावली? या पत्रकारांच्‍या प्रश्‍‍नांसमोर अभाविपचे कार्यकर्ते पुरते निरुत्तर झाले.

दैनिक गोमन्तक

ABVP Protest: गोवा विद्यापीठात 18 जानेवारीला मध्‍यरात्री ‘अभाविप’ने ठिकठिकाणी संघटनेची पोस्‍टर्स लावली होती. ही कृती आक्षेपार्ह असून, त्‍यामुळे विदृपीकरण झाले आहे, असा दावा ‘एनएसयूआय’ गोवाने केला होता.

त्‍यावर ‘अभाविप’ने स्‍पष्‍टीकरण देताना ‘हो ती पोस्‍टर्स आमच्‍याच कार्यकर्त्यांनी लावली होती’, असे उत्तर दिले. त्‍यासाठी परवानगी घेतली होती का आणि मध्‍यरात्री पोस्‍टर्स का लावली, आदी पत्रकारांच्‍या प्रश्‍‍नांसमोर अभाविपचे कार्यकर्ते पुरते निरुत्तर झाले.

पणजी येथे सोमवारी ‘अभाविप’ने पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी संघटनेच्‍या गोवा समन्वयक धनश्री मांद्रेकर, झेवियर्स महाविद्यालय विद्यार्थी समिती सरचिटणीस साहील महाजन, उत्तर गोवा समन्वयक सुदीप नाईक, विनय राऊत उपस्थित होते. याप्रसंगी ‘अभाविप’च्‍या कार्यकर्त्यांना विद्यापीठात लावण्‍यात आलेल्‍या पोस्‍टर्सविषयी विचारण्‍यात आले.

योग्‍य ती कारवाई करणार

गोवा विद्यापीठाचे कुलसचिव व्ही. एस. नाडकर्णी यांच्‍याशी संपर्क साधला असता ते म्‍हणाले, अभाविपने जे कृत्य केले आहे, त्‍याची पुनरावृत्ती होऊ नये तसेच शिस्‍तीसाठी कडक पावले उचलली जातील. सुरक्षेत कसूर राहिली असल्‍यास योग्‍य ती कारवाई केली जाईल.

विद्यार्थी मंडळ स्थापन करा : अभाविप

सेंट झेवियर्स महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांवर ‘अभाविप’ने आंदोलन केले. परंतु, त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे अयोग्‍य आहे. विद्यार्थी मंडळ स्‍थापन करा, एवढीच आमची मागणी आहे आणि त्‍याच्‍या पूर्ततेसाठी प्रचंड विलंब झाला आहे, असे यावेळी सांगण्‍यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT