Codli Mine Block Dainik Gomantak
गोवा

Codli Mine Block: कोडली खाण सुरू करण्याचे स्थानिकांकडून स्वागत; 'रोजगार द्या, पर्यावरणही जपा!'

Codli Mine Public Hearing Goa: डचडे बंद पडलेल्या खाणी त्वरित सुरू करण्याच्या निर्णयाचा सावर्डे मतदारसंघातील स्थानिकांनी गुरुवारी जोरदार स्वागत केले.

गोमंतक ऑनलाईन टीम

कुडचडे: बंद पडलेल्या खाणी त्वरित सुरू करण्याच्या निर्णयाचा सावर्डे मतदारसंघातील स्थानिकांनी गुरुवारी (ता.२२) जोरदार स्वागत केले. मात्र, या खाणी सुरू करताना स्थानिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याबरोबरच पर्यावरणाची हानी होणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली.

गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने गुरुवारी कोडली खाण ब्लॉकसाठी जाहीर जनसुनावणी घेतली. हा खाण ब्लॉक पूर्वी वेदांता कंपनी चालवत होती, जो आता ‘जेएसडब्ल्यू’ कंपनीमार्फत चालवला जाणार आहे. दरवर्षी साडेतीन दशलक्ष खनिज उत्खनन करण्याची क्षमता या खाण पट्ट्यात आहे.

किर्लपाल-दाभाळ येथील श्री पिसानी सातेरी देवस्थान आवारात झालेली ही सुनावणी धारबांदोड्याचे उपजिल्हाधिकारी विमोद दलाल आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे शास्त्रज्ञ डॉ. मोहन गिरप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी स्थानिक आमदार गणेश गावकर आणि सावर्डेचे माजी आमदार विनय तेंडुलकर यांच्यासह किर्लपाल-दाभाळचे सरपंच दामोदर बांदेकर, उपसरपंच कालिदास गावकर, सावर्डेच्या सरपंच चिन्मयी नाईक, धारबंदोडाचे माजी सरपंच बालाजी गावस, सावर्डेचे पंच संजय नाईक तसेच अन्य पंच सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.

स्थानिक भागात विकासकामे करावीत

स्थानिकांनी वेदांता व चौगुले कंपनीतून कमी केलेल्या कामगारांना पुन्हा नोकरीत प्राधान्य देण्याची मागणी केली. वाहतुकीसाठी स्थानिक ट्रक आणि रोजगारासाठी तरुणांना प्राधान्य द्यावे. ‘जेएसडब्ल्यू’कडून नियमांचे उल्लंघन झाल्यास किंवा तक्रारी आल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुन्हा जनसुनावणी घ्यावी. तसेच ‘सीएसआर’ निधीतून स्थानिक भागात विकासकामे करावीत, अशा सूचनाही केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Real Estate Dispute: कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर सहन करणार नाही! हायकोर्टाचा प्रकाश अग्रवाल यांना मोठा दणका; ठोठावला 'इतक्या' हजारांचा दंड

Tibet Earthquake: तिबेटमध्ये विनाशकारी भूकंप! 16 जणांचा मृत्यू, 340 हून अधिक घरे जमीनदोस्त; रुग्णालयांमध्ये जखमींची गर्दी VIDEO

Land Conservation: गोव्यात आणखी 12.96 लाख चौरस मीटर जमीन 'नो-डेव्हलपमेंट झोन'मध्ये; सात तालुक्यांचा समावेश

IND vs NZ: ईशान किशन दुखापतीमुळे दुसऱ्या टी-20 मधून बाहेर; वैभव सूर्यवंशीला मिळणार संधी, न्यूझीलंडविरुद्ध 'अशी' असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

Goa Politics: 'पोलिसांनी आधी सत्य शोधावे'; हरमल पंचक्रोशीच्या तक्रारीवरून पार्सेकर-आरोलकर आमनेसामने

SCROLL FOR NEXT