Coconut Feni Goa Dainik Gomantak
गोवा

Coconut Feni GI Tag: माडाच्या फेणीबाबत सरकारने जबाबदारी घ्यावी; गोवा रैंदेर संघटनेने केलीय 'ही' मागणी

माडापासून बनविल्या जाणाऱ्या फेणीला शेकडो वर्षांचा इतिहास आहे

Ganeshprasad Gogate

Coconut Feni Goa: गोवा म्हटलं कि काजू फेणी प्रामुख्याने ओळखली जाते. पर्यटनाच्या यादृष्टीने देखील काजू फेणीची मोठ्या प्रमाणवर विक्री होते. सरकारने गोव्याच्या या काजू फेणीला GI मानांकन मिळवून दिले आहे. त्याच प्रमाणे आता माडापासून बनवल्या जाणाऱ्या फेणीचे जीआर टॅगिंग करावे, अशी मागणी अखिल गोवा रैंदेर संघटनेने केली आहे.

माडाच्या फेणीचे जीआर टॅगिंग करावे, अशी मागणी अखिल गोवा रैंदेर संघटनेने केली आहे. शनिवारी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केली. माडापासून बनविल्या जाणाऱ्या फेणीला शेकडो वर्षांचा इतिहास आहे, याकडे संघटनेचे अध्यक्ष फ्रान्सिको फर्नाडिस यांनी लक्ष वेधले.

संघटनेच्या मागील समितीने माडापासून बनविल्या जाणाऱ्या फेणीला जीआय टॅग द्यावा, अशी मागणी केली होती; पण सरकारने तो अर्ज फेटाळला. खरे तर माडापासून बनविल्या जाणाऱ्या फेणीला जीआय टॅग द्यायला हवा होता.

माडाला राज्य वृक्ष म्हणून दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे माडाचे जतन व संवर्धन करणे तसेच ते सुरक्षित ठेवणे आणि त्याला चालना देणे ही सरकारची जबाबदारी आहे.

माडापासून बनविला जाणारा गूळ आणि व्हिनेगर यांनाही जीआय टॅग द्यायला हवा. त्यासंदर्भात विज्ञान व तंत्रज्ञान खात्याकडे संघटना अर्ज करेल, असे यावेळी सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT