Approved Canva
गोवा

Entertainment Center In Panjim: ...अखेर करमणूक केंद्राला किनारी क्षेत्र प्राधिकरणाची मंजुरी!

Goa Coastal Zone Management Authority: प्राधिकरणाच्या तज्ञ सदस्यांनी आक्षेप घेतल्याने पर्यटन खात्याचा हा प्रस्ताव प्रलंबित राहिला होता

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: पणजीत मांडवी तिरी उभारण्यात येणाऱ्या करमणूक केंद्राला गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. यापूर्वी प्राधिकरणाच्या तज्ञ सदस्यांनी आक्षेप घेतल्याने पर्यटन खात्याचा हा प्रस्ताव प्रलंबित राहिला होता.

पूर्वी ‘मांडवी रिव्हेरा’ असलेल्या परिसरात हे करमणूक केंद्र आकाराला आणण्याचा प्रस्ताव पर्यटन खात्याने प्राधिकरणाच्या मंजुरीसाठी पाठवला होता. सागरी अधिनियम क्षेत्र दोनमध्ये असे वाणिज्य वापराचे करमणुकीचे प्रकल्प होऊ देण्याची तरतूद नसल्याचे मत मार्चमध्ये या जागेची पाहणी केल्यानंतर प्राधिकरणाच्या तज्ज्ञ सदस्यांनी व्यक्त केले होते.

असे असतानाही सागरी अधिनियमाच्या अधिसूचनेचा आधार घेत प्राधिकरणाने या महिन्यात झालेल्या आपल्या बैठकीत या करमणूक केंद्राला हिरवा झेंडा दाखवला आहे. यासाठी त्यांनी या करमणूक केंद्राच्या प्रस्तावित जागेत १९९१ पूर्वीचे बांधकाम अस्तित्वात असल्याचा आधार घेतला आहे.

सार्वजनिक व खासगी भागीदारीतून हा प्रकल्प पर्यटन खाते आकाराला आणण्यासाठी इच्छुक आहे. यासाठी साडेपाच हजार चौरस मीटर जागेचा वापर खाते करणार आहे. खासगी कंपनीला २७ वर्षे भाड्याने दिलेली ही जागा २०२२ मध्ये परत घेण्यात आली आहे. त्या ठिकाणी करमणूक केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यासाठी जानेवारीमध्ये एका कंपनीसोबतही पर्यटन खात्याने सामंजस्य करार केला आहे. प्राधिकरणाने यासाठी सध्याचे बांधकाम पाडण्यासाठी असलेली परवानगी तसेच बांधकामासंदर्भातील इतर कागदपत्रांची मागणी पर्यटन खात्याकडे केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT