CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Land Grabbing Case: '...तर सरकारला या प्रकरणावरुन एसआयटी स्थापावी लागली नसती'

''Land Grabbing प्रकरणे गांभिर्याने हाळण्याची गरज''

दैनिक गोमन्तक

गोवा राज्यात बेकायदा जमीन हडप प्रकरणात 200 पेक्षा अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. याची दखल घेत सावंत सरकारने एसआयटी स्थापन करत या प्रकरणाच्या तळाशी जाणार असल्याची भुमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला असता तर ही वेळ आली नसती असे मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटलं आहे.

(Goa CM say SIT formed as cops didn't take plaint of land grabbing seriously for 20 years)

याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या 15 ते 20 वर्षांमध्ये प्रकराच्या तक्रारी आवश्यक त्या गांभिर्याने हाताळल्या गेल्या नाहीत जमीन हडपल्याच्या विविध तक्रारींवर पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती, तर राज्य सरकारला या प्रकरणांच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करावे लागले नसते.

पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांकडे अनेक तक्रारी येत होत्या, परंतु ते नित्याचे मानले गेले आणि काही प्राथमिक तपासानंतर बाजूला ठेवण्यात आले. म्हणूनच गेल्या 15 ते 20 वर्षांपासून, 110 मालमत्तांचा समावेश असलेल्या जमिनी बळकावण्याच्या घटना वाढत गेल्या. या बाबत आता गृहखाते विभागप्रमुखांनी अधिक सतर्क असले पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीप्रमाणए दाखल झालेल्या तक्रारींमध्ये काही मालमत्ता परदेशात राहणाऱ्या व्यक्तींच्या आहेत आणि या जमिनी त्रयस्थ व्यक्तीने सरसकट विकल्या आहेत. यामूळे विभागप्रमुखांनी सतर्कता दाखवली असती तर 99% लोकांचे प्रश्न सुटतील. मग लोकांना कोणत्याही राजकारण्याकडे जावे लागणार नाही. तसेच यापुढे 9319334335 या क्रमांकावर कॉल करून, 8956642400 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप संदेश पाठवून आणि goapublicgrievance@gmail.com या ईमेलवर तक्रारी नोंदवता येतील. असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT