Goa CM Dr. Pramod Sawant And Health Minister Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

प्रमोद सावंत, विश्वजीत राणे यांच्यातील वाद शाहांच्या दरबारी! दिल्लीच्या बैठकीत नक्की काय घडलं?

Goa Politics: दोन्ही नेत्यांनी बैठकीविषयी जाहीरपणे बोलणे टाळल्याने सोयीस्कर अशा राजकीय चर्चेला ऊत आला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: दिल्लीत सोमवारी रात्री भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत नेमके काय ठरले, याविषयीचे गूढ अद्याप कायम आहे. या बैठकीत सहभागी झालेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी सविस्तर माहिती देण्यास नकार दिल्यामुळे या बैठकीत फार मोठी चर्चा झाल्याचे अनुमान राजकीय वर्तुळातून काढले जात आहे.

'भिवपाची गरज ना'
मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांनी समाज माध्यमांवर 'भिवपाची गरज ना' असा प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे दिल्लीतील बैठकीत राजकीय स्पर्धेबाबतीत चर्चा झाली आहे असे दिसून येते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेही या बैठकीला उपस्थित होते. अलीकडे राणे यांनी बेरोजगारांसंदर्भात केलेल्या विधानावरून ते चर्चेत आले होते. राज्यातील भू - रूपांतर करण्यास कोणी परवानगी दिली, यावरूनही दोन्ही नेत्यांत वाद आहेत.

या पार्श्वभूमीवर दिल्लीत बैठक बोलावली गेल्याने त्याविषयीच्या तर्कवितर्वांना उधाण आले होते. पक्षश्रेष्ठी या दोन्ही नेत्यांना जाहीर वक्तव्य न करण्याबाबतची तंबी देतील, अशी अटकळही व्यक्त केली जात होती.

काही जणांनी याचा संबंध मंत्रिमंडळ फेर बदलाशीही लावला होता. काही जणांच्या चर्चेची तर आमदार दिगंबर कामत यांना सभापती करून रमेश तवडकर यांना मंत्रिमंडळात सामावून घेतले जाईल, इथपर्यंतही मजल गेली होती.

प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी ही बैठक मंत्रिमंडळ फेरबदलाशी संबंधित नाही, असे स्पष्ट केल्यानंतर मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्यातील वाद मिटवण्यासाठी ही बैठक झाली अशी चर्चा सुरू झाली आहे. या दोन्ही नेत्यांनी बैठकीविषयी जाहीरपणे बोलणे टाळल्याने सोयीस्कर अशा राजकीय चर्चेला ऊत आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT